घरताज्या घडामोडीजागतिक रेडिओ दिन

जागतिक रेडिओ दिन

Subscribe

जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी 2012 पासून साजरा केला जातो. यानिमित्त इटलीमध्ये पहिल्यांदा सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात आला. याचे आयोजन इटालॅडियोज संस्था, अभियांत्रिकी आणि दूरसंचार विभागाच्या वतीने करण्यात आले होते. 2011 साली युनेस्कोच्या 36 व्या सत्रामध्ये ‘जागतिक रेडिओ दिन’ची घोषणा करण्यात आली.

रेडिओचा शोध १८८५ साली माकरेनी याने लावल्याचे मानले जाते, मात्र त्या आधीपासूनच जगातल्या विविध भागांत विविध बिनतारी प्रक्षेपणाचे प्रयोग सुरू होते. रेडिओचा भारतातला इतिहास तसा जुना आहे. जगदीशचंद्र बोस यांनीही अशाच एका प्रयोगाचे प्रदर्शन कोलकात्यात १८८४ साली केले होते. पुढे या रेडिओ तंत्राचा वापर सैनिकी व इतर कामांसाठी व्हायला लागला. भारतात रेडिओची सुरुवात १९२३ साली रेडिओ क्लब इथे झाली.

- Advertisement -

भारतात ‘बीबीसी’च्या धर्तीवर इंग्रज सरकारने ‘इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ची स्थापना केली. 1927 साली पहिल्यांदा याचे प्रसारण सुरू झाले; तर 1932 साली बातम्यांचे प्रसारण होऊ लागले. 8 जून 1936 रोजी ‘भारतीय स्टेट ब्रॉडकास्टिंग’ सेवा ‘ऑल इंडिया रेडिओ’ झाली. स्वातंत्र्यानंतर 1957 साली ऑल इंडिया रेडिओचे नाव बदलून आकाशवाणी असे ठेवण्यात आले. रेडिओचा वापर दुसर्‍या महायुद्धात बातम्या देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला. १९७७ साली भारतात एफएम रेडिओचे तंत्रज्ञान आले. सध्या आकाशवाणीच्या अनेक रेडिओ स्टेशन्सबरोबरच खासगी रेडिओ वाहिन्याही आपल्या कार्यक्रमाचे प्रसारण करत आहेत. खासगी एफएम वाहिन्यांची सुरुवात १९७७ साली मद्रासपासून झाली. त्यानंतर गोवा राज्यात काही खासगी रेडिओ वाहिन्यांना परवाने मिळाले. सध्या भारतातल्या ७२ शहरांमध्ये खासगी एफएम वाहिन्या कार्यरत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -