घरक्राइमखळबळजनक! वाशिममध्ये जळालेल्या अवस्थेत तरुणीचा आढळला मृतदेह!

खळबळजनक! वाशिममध्ये जळालेल्या अवस्थेत तरुणीचा आढळला मृतदेह!

Subscribe

वाशिममधील उंबर्डा परिसरातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आज सकाळी या परिसरात एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. उंबर्डा बाजार या रस्त्यावरील मंदिर लगतच्या परिसरात गुराख्यांना तरुणीचा मृतदेह सापडला. तसंच घटनास्थळावरून काही अंतरावर रक्ताने माखलेल्या दगडही आढळून आला आहे.

मृतदेह आढळल्याने परिसरात उडाली एकच खळबळ

वाशिमच्या कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार येथील ही घटना आहे. उंबर्डा बाजार येथे तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून काही अंतरावर रक्ताने माखलेला दगड सापडल्याने हा तरुणीना खूप करण्यात आला आहे, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

पोलिसांचा अधिक तपास सुरू 

वाशिम, यवतमाळ किंवा अकोला असो या परिसरात अनेक मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी हा प्रकार तर नसावाना अशी पोलिसांकडून शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच सदर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. नेमकी घटना काय घडली? केव्हा घडली? या सर्व गोष्टींचा तपास यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा परिसरातील पोलीस करत आहेत.


हेही वाचा – नवरा जेलमध्ये असताना बायकोने साधली दिराशी जवळीक, संधी पाहून नवऱ्याने काढला…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -