घरक्राइमपत्ता विचारण्यासाठी ड्रायव्हरने महिलेला जवळ बोलावलं आणि पँटची चॅन उघडली

पत्ता विचारण्यासाठी ड्रायव्हरने महिलेला जवळ बोलावलं आणि पँटची चॅन उघडली

Subscribe

विकृती कोणत्या थराला जाईल काहीही सांगता येत नाही. देशभरात महिलांवर अत्याचाराच्या बातम्या एकामागून येत असताना मुंबईतही एक धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. दोन महिलांना एका विकृत प्रसंगाला सामोरे जावे लागले. मात्र या महिलांनी मोठ्या हिमंतीने या प्रसंगाला तोंड तर दिलेच, मात्र ज्या तरुणाने अश्लिल कृत्य केले, त्यालाही चांगलाच धडा शिकवला. शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विद्याविहार रेल्वे स्थानकानजीक ही घटना घडली. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

त्याचे झाले असे की, विद्याविहार स्थानकाजवळ एका कारचालकाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन महिलांना आवाज दिला. महिला मदत करण्यासाठी म्हणून जशा कारजवळ आल्या, तसे विकृत ड्रायव्हरने आपले गुप्तांग बाहेर काढून दाखवले. या प्रसंगामुळे त्या दोघीही हादरून गेल्या. ड्रायव्हरने क्षणाधार्त तिथून पळ काढला. मात्र या महिलांनी स्वतःला सावरत त्या गाडीचा नंबर ध्यानात ठेवला. त्यानंतर दोघींनी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

- Advertisement -

पोलिसांनीही लगेचच महिलांनी दिलेल्या नंबरच्या आधारे गाडीचा शोध घ्यायला सुरुवात केली. महिलांनी दिलेल्या नंबरच्या आधारे काही तासातच आरोपीला नटराज बार जवळून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांसमोर त्याने आपला गुन्हा मान्य केला. २७ वर्षीय आरोपीचे नाव बिट्टू पालसिंग पर्चा असून तो सफाई कामगार म्हणून काम करतो. तो चालवत असलेली गाडी त्याच्या मित्राची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कायद्यातंर्गत कलम ३५४ (अ) (१) लैंगिक अत्याचार, कलम ५०९ आणि ३३६ अनुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान मुंबईत अद्याप पुर्णपणे अनलॉक झाला नसतानाही डान्स बार पुन्हा सुरु झाले आहेत. शनिवारी गोरेगाव येथे एका बारवर धाड टाकून पोलिसांनी १९ लोकांना ताब्यात घेतले होते. परिमंडळ सहाचे अतिरीक्त पोलीस आयुक्त विशाल ठाकूर यांनी सांगितले की, १५ ग्राहकांसहीत चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच ११ बारबालांची सुटका करण्यात आली आहे. कोणतीही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे हा बार सुरु होता. काही खास ग्राहकांसाठीच बार खुला करण्यात आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली.

- Advertisement -

४ बज गये, लेकिन पार्टी अभी बाकी है! Dance Bar Raid in Mumbai Goregaon

४ बज गये, लेकिन पार्टी अभी बाकी है !मुंबईच्या गोरेगाव परिसरात मुंबई पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री एका बारवर छापा मारला. इथल्या तकिला (स्टार) बार मध्ये दररोज पहाटे ४ वाजेपर्यंत डान्स बार सुरू असल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. शिवाय, तिथे १५ ते २० बारबाला देखील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बांगुरनगर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या सुमारास या बारवर छापा टाकला. बारबालांचा तमाशा सुरू असताना अचानक पोलिसांनी मारलेल्या छाप्यामुळे पळापळ सुरू झाली. या कारवाईत पोलिसांनी १५ बारबाला, १५ ग्राहक आणि बारमधल्या ४ कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Saturday, October 10, 2020

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -