Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 "सोने की चिडीया" असलेल्या मुंबईला सरकारकडून लुटण्याचा प्रयत्न; अंबादास दानवेंचा आरोप

“सोने की चिडीया” असलेल्या मुंबईला सरकारकडून लुटण्याचा प्रयत्न; अंबादास दानवेंचा आरोप

Subscribe

दळणवळण, वाहतुकीसारखे मुंबईचे गंभीर प्रश्न सोडवण्यास सरकार कमी पडतय असा गंभीर आरोप आज गुरूवारी (ता. २३ मार्च) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केला. २६० अनव्ये प्रस्तावावर चर्चा करताना ते बोलत होते.

मुंबई खऱ्या अर्थाने “सोने की चिडीया” असून तिला लुटण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे. खऱ्या अर्थाने मुंबईचा स्वाभिमान जपायचा असेल तर, मुंबईच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. कंत्राटदारांना पोसण्याचं कार्य बाजूला ठेऊन मूलभूत प्रश्न सोडवण्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे. मराठी जनतेचा स्वाभिमान जागरूक ठेवला पाहिजे, कोळी वाड्यांचे सीमांकन निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानग्या घेतल्या पाहिजे. जनतेच्या हक्काच्या पैशातून क्लायमेट चेंज ऍक्शन प्लँन पुढे नेण्याची आवश्यकता आहे, अशा सूचना दानवे यांच्याकडून यावेळी राज्य सरकारला करण्यात आल्या.

१३ मार्चला मुंबई उपनगरातील मालाडमध्ये असलेल्या आप्पा पाडा परिसराला लागलेल्या आगीबाबत देखील दानवे यांनी यावेळी मुद्दा मांडला. मालाडमध्ये सातत्याने आग लागल्याचे प्रकार घडला, यामुळे सर्वसामान्यांची घरे रस्त्यावर येत असतील तर लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

तसेच, मुंबईतील अनेक कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट घातला जातोय. वस्त्रोद्योग आयुक्तालय मुंबई बाहेर गेल्यास मुंबईवर अन्याय होईल, असे दानवे यांनी म्हंटले. तर रस्ते कामं, फर्निचर, सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आदी कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

मुंबईतील स्ट्रीट फर्निचर, सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आदींवर कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राटदारांना पोसण्याचं काम सुरू आहे. जुनी काम नव्याने करून स्वतःची पाठ थोपठण्याचा काम सरकार करत असल्याचे सांगत त्यांनी सरकारने विविध कामात कंत्राटदारांचा फायदा केल्याप्रकरणी सरकारवर घणाघात केला.

- Advertisement -

तर सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून देखील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला खडेबोल सुनावले. काल एका नेत्याची शिवतीर्थावर सभा झाली. मुंबईतील रस्ते म्हणजे डान्स बार वाटू लागले आहेत, असे वक्तव्य त्या नेत्याने शिवतीर्थावर केले. यासाठी कित्येक डिव्हायडर तोडले गेले. कित्येक एलईडी लाईट काढल्या गेल्या. कित्येक जुन्या कुंड्या हटवल्या गेल्या. कित्येक जुने फुटपाथ खंदून काढले गेले. जेकाम चांगले होते, त्याला खराब करून नव्याने करायचे आणि त्याला सुशोभीकरण म्हणायचे. मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करायची आणि स्वतःची पाठ थोपटवून घ्यायची, असा हा प्रकार असल्याचे म्हणत दानवेंनी सरकरवर निशाणा साधला.


हेही वाचा – मुंबई महापालिकेने ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीवरून परब – सामंतांमध्ये सभागृहात खडाजंगी

- Advertisment -