घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी १० हजारांची वाढ; अर्थसंकल्पात करण्यात आली मोठी घोषणा

शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी १० हजारांची वाढ; अर्थसंकल्पात करण्यात आली मोठी घोषणा

Subscribe

वित्त मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना शिक्षकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये शिक्षकांच्या मानधनात सरासरी १० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता शिक्षक वर्गाला देखील याचा मोठा फायदा होणार आहे.

राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. पाच ध्येयावर आधारित असणाऱ्या या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण या विभागासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांना भरघोस मानधन देण्याची घोषणा केली आहे. फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार शिक्षकांच्या मानधनात १० हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या आताच्या असलेल्या मानधनात १० हजारांनी वाढ होणार आहे.

वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनुसार, आता प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवक यांचे ६ हजार रुपयांवरून मानधन हे 16 हजार रुपये होणार आहे. तर माध्यमिक शिक्षण सेवक यांचे 8 हजार रुपयांवरून मानधन 18 हजार रुपये आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन 9 हजार रुपयांवरून 20 हजार रुपये इतके होणार आहे. त्यामुळे शिक्षक सेवकांच्या बाबतीतला मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच, राज्य शासनाकडून खाजगी अनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदानावर आणण्याची प्रक्रिया सुरु असून यावर्षी अंशदा अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी १ हजार १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार, पीएमश्री शाळा या योजनेचा आरंभ करण्यात आला आहे. ८१६ शाळांना पीएमश्री शाळा म्हणून विकसित करण्यासाठी पुढील पाच वर्षात १ हजार ५३४ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येईल. सन २०२३-२४ या वर्षाकरिता शालेय शिक्षण विभागाकरिता २ हजार ७०७ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – लेक लाडकी योजनेतून प्रत्येक मुलीला मिळणार लाखो रुपये, फडणवीसांची मोठी घोषणा

- Advertisement -

विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती मिळणार असल्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. नवीन घोषणेनुसार, ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम ही १ हजार रुपयावरून ५ हजार रुपये म्हणजेच ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम ही १ हजार ५०० रुपयांवरून ७ हजार ५०० रुपये इतकी करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3 हजार 500 वरुन 5 हजार रुपये करण्यात आले आहे. तर गटप्रवर्तकांचे मानधन 4 हजार 700 वरुन 6हजार 200 रुपये, अंगणवाडी सेविकांचे मानधन 8 हजार 325 रुपयांवरुन 10 हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5 हजार 975 रुपयांवरुन 7 हजार 200 रुपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4 हजार 425 रुपयांवरुन 5 हजार 500 रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20 हजार पदे भरण्यात येणार असून अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली राबवण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -