घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023विधानपरिषदेत सरकारकडून विरोधी पक्षाची गळचेपी; अंबादास दानवेंचा आरोप

विधानपरिषदेत सरकारकडून विरोधी पक्षाची गळचेपी; अंबादास दानवेंचा आरोप

Subscribe

विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाज हे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विरोधकांनी प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्येच हस्तक्षेप केला, तर सत्ताधारी विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाज हे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विरोधकांनी प्रस्ताव मांडण्यास सुरुवात केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्येच हस्तक्षेप केला, तर सत्ताधारी विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

कांद्याच्या प्रश्नावरून आज सकाळपासूनच विरोधकांकडून राज्यसरकारला प्रश्न विचारण्यात येत आहेत. तर विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच दोन्ही सभागृहात कांद्याच्या दराचा प्रश्न विरोधकांनी उचलून धरला. या मुद्द्यामुळे झालेल्या गदारोळानंतर विधानपरिषदेचे आजच्या दिवसभराचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

- Advertisement -

कामकाज स्थगित झाल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात कांदा, कापसाला भाव मिळत नाही. याआधी कापसाला 13 ते 14 हजारांचा भाव मिळत होता. मात्र, आता तो 7 हजारापर्यंत आला आहे. केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियातून कापसाच्या गाठी आयात केल्या आहेत. हा सगळा विषय घेऊन आज महाविकास आघाडीने 289 च्या अंतर्गत चर्चेची मागणी केली. परंतु, ही मागणी करत असताना आम्ही आमची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र भूमिका न मांडताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला.” अशी माहिती यावेळी दानवेंकडून देण्यात अली.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, “खऱ्या अर्थाने विरोधी पक्षांचा हा प्रस्ताव असतो, हक्क असतो. याच्यावर जनतेचे प्रश्न मांडवे लागतात. हे सगळं न मांडताच सरकारनं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कांदा, कापूस, द्राक्षे, हरभरा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना दहा दिवस जेलमध्ये ठेवलं. या सगळ्या विषयांवर चर्चेची मागणी केली असता, पूर्ण चर्चा न होऊ देता आमचा प्रस्ताव अमान्य करण्यात आला. यावेळी फडणवीस यांच्याकडून मध्येच दिलेलं उत्तर चुकीचं होतं.” तर सरकार विरोधकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करतंय, असा आरोप देखील अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -