मराठी भाषा दिनी अधिवेशनात राज्यपालांनी हिंदीत भाषण केल्याने जितेंद्र आव्हाड संतापले

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली नाराजी व्यक्त केली.

Jitendra Awhad got angry when the Governor spoke in Hindi at the Marathi Language Day

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला विधानसभेच्या संयुक्त सभागृहात राज्यपाल आपले पहिले भाषण हिंदीत करतात हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणावर आपली नाराजी व्यक्त केली.

राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या सुरुवातील राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषणाचे वाचन केले. मराठी भाषा दिनाच्या दिवशीच राज्यपालांनी हिंदी भाषेत अभिभाषण केल्याने अनेक विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईच्या मातीला भाषेचा सुगंध आहे. त्या प्रांतात येऊन ती भाषा न बोलता उत्तर भारतातील हिंदी इथल्या माणसांच्या डोक्यावर बसवण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे, असा आरोप देखील जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आला आहे.

आज विधानसभेत सर्वच सदस्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून एकत्र आले असे सांगतानाच दुर्गा भागवत यांनी संस्कृतपेक्षा आधी मराठीचा जन्म झाला आहे असे सांगितले आहे. तर दुसरीकडे दक्षिण प्रांतात आठ भाषा अभिजात भाषेचा दर्जा घेऊन बसल्या आहेत आणि मराठी आजही दिल्लीच्या तख्तावर डोकं घासून आमच्या भाषेला अभिजात दर्जा द्या सांगत आहे, याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – शहरांची नावे बदलण्यासाठी नामकरण आयोगाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

दरम्यान राज्यपालांच्या भाषणाला कॅबिनेटमध्ये परवानगी दिली जाते, याचा अर्थ ही परवानगी हिंदी भाषेला दिली गेली. आज मराठी भाषा दिन आहे त्याचदिवशी हे दुर्दैवी आहे असेही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे. पण ज्यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली होती, तेव्हा ती शपथ त्यांनी मराठीमध्ये घेतली होती. ज्यामुळे त्यांचे कौतूक करण्यात आले होते. पण आज नेमके अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच मराठी भाषा दिन असून देखील राज्यपालांनी हिंदीत अभिभाषणाचे वाचन केल्याने राज्यपालांविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.