घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023विभिषण वारे हल्ल्याप्रकरणी प्रविण दरेकर आक्रमक; विरोधी पक्षनेते दानवेंनी उपस्थित केला मुद्दा

विभिषण वारे हल्ल्याप्रकरणी प्रविण दरेकर आक्रमक; विरोधी पक्षनेते दानवेंनी उपस्थित केला मुद्दा

Subscribe

शनिवारी दहिसर येथे भाजपचे कार्यकर्ते बीभीषण वारे यांच्यावर काही लोकांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याबाबत आज (ता. २० मार्च) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्यानंतर आमदार प्रविण दरेकर हे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. तर या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

शनिवारी भाजप कार्यकर्ते विभिषण वारे यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून विधान परिषदेच्या सभागृहात देण्यात आली. तसेच याबाबतची संपूर्ण माहिती राज्याचे गृहमंत्री आणि राज्य सरकारकडून देण्यात यावी, असेही दानवे यांच्याकडून सांगण्यात आले. या मुद्द्यावर आमदार प्रविण दरेकर यांनी सुद्धा सभागृहात आपले मत व्यक्त केले. यावेळी बोलताना दरेकर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

विभिषण वारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी बोलताना आमदार प्रविण दरेकर म्हणाले की, विभिषण वारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. हल्ला झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यासाठी सुद्धा पोलिसांकडून दिरंगाई करण्यात आली. ज्यामुळे या हलगर्जीपणासाठी तिथल्या डीसीपीला तात्काळ निलंबीत करण्यात यावे. तर शताब्दी रुग्णालय येथे बिबिशन वारे यांना घेऊन गेल्यानंतर तिथे देखील कारण देत त्यांना नको ते कारण देत दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. ज्यामुळे शताब्दी रुग्णालयाच्या डीनला देखील या प्रकरणात निलंबीत करण्यात यावे, अशी मागणी यावेळी आमदार प्रविण दरेकर यांच्याकडून करण्यात आली.

- Advertisement -

हल्ला करणारे कोणाचे कार्यकर्ते होते, हे जाणून घेणे महत्वाचे नाही. पण या पद्धतीने एका व्यक्तीवर ५५ जणांकडून करण्यात येणारा हल्ला चूकीची गोष्ट आहे. या घटनेतील ५५ आरोपींना तात्काळ अटक करत त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक भूमिका यावेळी आमदार प्रविण दरेकर यांच्याकडून घेण्यात आली. तर या घटनेचा व्हिडीओ देखील दरेकर यांच्याकडून सभागृहात दाखवण्यात आला.

दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून असाच एकप्रकार दहिसर मध्ये समोर आला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यात राज्यात शिवसैनिकांना मारहाणीचे प्रकार झाले असून वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले. पोलीस अशा प्रकरणांमध्ये एकांकी भूमिका घेत आहेत. दहिसरमध्ये लोकप्रतिनिधी व विधानसभेचे प्रतिनिधी यांच्या जवळपास ५० ते ५५ कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. विभिषण वारे अस त्या कार्यकर्त्यांच नाव आहे. मारहाणीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तलवारी व हातात काठ्या लाट्या घेऊन हे सर्व लोकं त्या कार्यकर्त्याला मारत असल्याचे दिसत आहे. यात एका गुन्हेगाराचे नाव आशिष नायर असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. यात आमदार यांच्या मुलाच्या ड्रायव्हरचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करायला विलंब लावला. तसेच पालिकेच्या रुग्णालय प्रशासनानेही त्या जखमी तरुणाला दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तरुणाला न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी दानवे यांनी सभागृहात केली.

तर या प्रकरणी काय कारवाई करण्यात आली याबाबतचे आज निवेदन देण्यात यावे, या घटनेच्या मागे कोणीतरी सूत्रधार आहे. आजपर्यंत तीन वेगवेगळ्या घटना सभागृहाच्या समोर आलेल्या आहेत. ज्यांचा वारंवार उल्लेख करणे चूकीचे वाटते. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये नेमकी काय कारवाई करण्यात येते, याबाबतची माहिती सभागृहात देण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आले आहेत.


हेही वाचा – मिहीर कोटेचांचा प्रदूषणावरून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -