घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023अनिल परबांची आक्रमक भूमिका; सहाय्यक आयुक्त महेश अहिरचा कार्यभार काढून घेण्याची उदय...

अनिल परबांची आक्रमक भूमिका; सहाय्यक आयुक्त महेश अहिरचा कार्यभार काढून घेण्याची उदय सामंतांची घोषणा

Subscribe

ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांचे निलंबन करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती. पण अखेरीस या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अहिर यांचा पदभार काढून घेण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाणे महानगरपालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांचे निलंबन करण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती. पण अखेरीस या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अहिर यांचा पदभार काढून घेण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आली. विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मंत्री सामंत यांच्याकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. या मुद्द्यावरून आमदार अनिल परब यांनी उदय सामंत यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तर हा व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाव घेत असल्याने त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाही का? असा प्रश्न देखील अनिल परब यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

यावेळी महेश अहिर प्रकरणावर बोलताना आमदार अनिल परब म्हणाले की, महेश अहिर हा माणूस दोन वेळा निलंबित आहे. तरी याला चांगल्या ठिकाणी नियुक्ती मिळते. या माणसाला आमच्या पेक्षा जास्त बॉडीगार्ड आहे. तसेच तो १०वी नापास असून सुद्धा अधिकारी कसा झाला? हा व्यक्ती दारू पिऊन मुख्यमंत्र्यांना फोन लावला असे सांगतो आणि मुख्यमंत्री काम करणार आहेत, अशी माहिती देतो. ज्याची चौकशी करायची आहे तो अजुन पदावर कसा काय आहे? या व्यक्तीला ताबडतोब निलंबित करणार आहात का? ज्या अधिकाऱ्यावर आरोप होत आहेत. तो 10-10 बॉडीगार्ड घेऊन फिरत आहे. याच्याकडे पैसा आला कुठून? असे प्रश्न यावेळी उपस्थित करत अनिल परब हे आक्रमक झाले.

- Advertisement -

दरम्यान, या प्रश्नाला उत्तर देत मंत्री उदय सामंत म्हणाले की, सहाय्यक आयुक्त यांनी कुठं ही चुकीचं केलं आहे अस मी म्हणालो नाही. सदनिका प्रकरणात अहवाल सादर झाला आहे. त्यात ठाणे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याचा सहभाग नसल्याचेही समोर आले आहे. संबंधित अधिकाऱ्याच्या ज्या आॅडिओ क्लिप समोर आल्या आहेत, त्याच्यावर जे काही आरोप आहेत, त्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तर मुख्यमंत्री हे ठाण्याचे असल्याने त्यांना यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचेही यावेळी सामंत म्हणाले.

तर, सीआयडी चौकशी सुरू आहे असे आपण म्हणत आहात. परंतु सदनिका वाटपात महापालिका अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला असल्याचे दिसत आहे. या व्यक्तीवर आरोप स्पष्ट होतं आहे, अशी माहिती देत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी महेश अहिर यांच्यावर कोणत्या प्रकारची आणि कशी कारवाई करण्यात येईल, असा प्रश्न उपस्थित केला.

- Advertisement -

परिणामी, विरोधकांकडून या प्रकरणाची आक्रमक भूमिका घेण्यात आल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांचा कार्यभार काढून घेण्यात आल्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांच्याकडून विधान परिषदेच्या सभागृहात करण्यात आली.


हेही वाचा – शपथ घेऊन पाठित खंजीर खुपसणारे हे गद्दारच; आदित्य ठाकरेंचा मंत्री दादा भुसेंना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -