घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023उद्धव ठाकरेंचा सरकारवर राज्यातील सद्य परिस्थितीवरून घणाघात

उद्धव ठाकरेंचा सरकारवर राज्यातील सद्य परिस्थितीवरून घणाघात

Subscribe

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सर्व निर्णय बरोबर होते, मग सरकार का पाडले असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

विधिमंडळाच्या बाहेरून उद्धव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारच्या धोरणांवर आणि टीकास्त्र डागले. शेतकरी मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्याशी सरकार चर्चा करायला तयार नाही. १२ मार्चपासून नाशिकमधून किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने निघाला आहे. त्यांना भेटायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही. हे सरकार नेमके कोणासाठी काम करत आहे, असा प्रश्न ठाकरेंनी उपस्थित केला.

राज्यातील उद्योग हे गुजरात आणि इतर राज्यात पळवले जात आहेत. त्यातच आता मुंबईतील एसीसीचे कार्यालय देखील पळवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारने दिल्लीश्वरांच्या चरणी महाराष्ट्र अर्पण करण्याचे काम सुरु केले आहे. जे कोणी याविरोधात बोलतील त्यांना तुरुंगात टाकले जात आहे, असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. तर आमचे निर्णय फडणवीसांना पटत होते, त्यांना आमचे निर्णय योग्य वाटत होते, तर मग आमचे महाविकास आघाडीचे सरकार का पाडले? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

- Advertisement -

यावेळी कर्मचारी आऊटसोर्सिंगवरुन देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. आऊटसोर्सिंगचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झालेला आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, त्यावर ठाकरेंनी म्हटले की, ‘आऊटसोर्सिंगचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळातच झाला होता, असं फडणवीस म्हणत असतील तर मग आमचे सरकार का पाडले. जर आमचे निर्णय तुम्हाला एवढे चांगले वाटत होते, तर आमचे महाविकास आघाडीचे सरकार का पाडले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केला आहे.

हेही वाचा – व्हायरल व्हिडीओ प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वेंनी लिहिले पत्र; हे तर….

- Advertisement -

तसेच यंदाच्या वर्षी शिंदे-फडणवीस सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प आणि जुन्या पेन्शनवरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. सरकारी कर्मचाऱ्यांचे सध्या आंदोलन सुरु आहे. त्यांच्या मागण्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. जुन्या पेन्शनला आमचा पाठिंबा आहे पण केंद्राची महाशक्ती असताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास हरकत या सरकारला काहीही हरकत नसावी. आज मला संपकऱ्यांचे नेते येऊन मला भेटले, उद्या सुद्धा काही नेते भेट घेणार आहेत. नवीन योजनेनुसार निवृत्त सरकारी कर्मचारी यांना मिळणारे वेतन पुरेसे नाहीये. त्यामुळे त्यांचे हे म्हणणे ऐकायचे कोणी?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

तर सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाला पंचामृत असे गोड नाव दिले आहे. पंचामृत म्हणजे ज्याने धड कोणाचेही पोट भरले जात नाही. तुमच्या हातावर पडेल तितके घ्या आणि डोक्यावरून हात फिरवा असा पंचामृताचा अर्थ लोकांनी समजून घेतला पाहिजे, असा टोला यावेळी ठाकरेंनी लगावला आहे. हा एक विचित्र अर्थसंकल्प आहे. या पंचामृतातील काही थेंब हे सरकारी कर्मचाऱ्यांवर उडवले असते तर काही झाले नसते. सरकार येते आणि जाते मात्र शासकीय यंत्रणा कायम राहते, हे सरकारने लक्षात घ्यावे, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -