घरअर्थजगतजीएसटी संकलनात 11 टक्क्याची वाढ, 1.4 लाख कोटींहून अधिक जमा

जीएसटी संकलनात 11 टक्क्याची वाढ, 1.4 लाख कोटींहून अधिक जमा

Subscribe

नवी दिल्ली : जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) संकलनात सातत्याने वाढ होत असून, सलग नऊ महिन्यांत मासिक जीएसटी महसूल 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक प्राप्त झाला आहे. नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात 11 टक्क्यांनी वाढ झाली असून या महिन्यात एकूण जीएसटी महसूल 1,45,867 कोटी रुपये झाला आहे.

या वर्षी एप्रिलमध्ये जीएसटी हेडअंतर्गत 1.68 लाख कोटी रुपये मिळाले होते. ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली होती. त्यानंतर ऑक्टोबर 2022मध्ये दुसरी मोठी वसुली झाली. या महिन्यात सरकारला जीएसटी संकलनात 1.51 लाख कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला होता.

- Advertisement -

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) 25,681 कोटी, राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) 32,651 कोटी, एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) 77,103 कोटी (त्यामध्ये वस्तूंच्या आयातीवर जमा झालेले 38,635 कोटी रुपयांचा समावेश आहे) आणि 10,433 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 817 कोटींसह) सेस अर्थात उपकर आहे.

सरकारने नियमित सेटलमेंट म्हणून आयजीएसटीमधून 33,997 कोटी रुपये सीजीएसटीला आणि 28,538 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. नोव्हेंबर 2022मध्ये नियमित सेटलमेंटनंतर केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 59678 कोटी आणि एसजीएसटीसाठी 61189 कोटी आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने नोव्हेंबर 2022मध्ये राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जीएसटी भरपाई म्हणून 17 हजार कोटी जारी केले होते.

- Advertisement -

नोव्हेंबर 2022चा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 11 टक्के जास्त आहे. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा महसूल 1,31,526 कोटी रुपये होता. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल 20 टक्यांहून जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात मिळालेल्या महसुलापेक्षा 8 टकक्यांहून जास्त आहे.

ऑक्टोबरमध्ये 1,51,718 कोटींचे संकलन
ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन 16.6 टक्क्यांनी वाढून 1,51,718 कोटी रुपये इतके झाले होते. त्यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 26,039 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 33,396 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,778 कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या 37,297 कोटींसह) आणि उपकर 10,505 कोटी रुपये (मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या 825 कोटींसह) यांचा समावेश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -