घरअर्थजगतप्रत्यक्ष कर संकलनात ३३ टक्क्यांनी वाढ, उद्दीष्ट्यपूर्ती होणार?

प्रत्यक्ष कर संकलनात ३३ टक्क्यांनी वाढ, उद्दीष्ट्यपूर्ती होणार?

Subscribe

आर्थिक वर्ष २०२३ साठी १४.२० ट्रिलिअन रुपयांचे कर संकलनाचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. कॉर्पोरेट करातून ७.२ ट्रिलिअन तर, वैयक्तिक आयकर आणि सिक्युरिटीज ट्रांजेक्शन टॅक्ससह विविध उत्पन्नांवरील करातून ७ ट्रिलिअन कराचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली – प्रत्यक्ष कर संकलनात (Direct Tax Collection) यंदा गेल्यावर्षीपेक्षा ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ३० ऑगस्टपर्यंत ४.८८ ट्रिलिअन रुपयांचे कर संकलन जमा झाले आहे, गेल्यावर्षी हाच आकडा ३.६ ट्रिलिअन रुपये इतका होता. कर संकलनाचा दर असाच राहिला तर कर उद्दीष्ट्य साध्य करू असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (Central Direct Tax Board) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केलाय. बिझनेस स्टॅण्डर्डला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

हेही वाचा मोठी बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत तब्बल १०० रुपयांची कपात

- Advertisement -

आर्थिक वर्ष २०२३ साठी १४.२० ट्रिलिअन रुपयांचे कर संकलनाचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे. कॉर्पोरेट करातून ७.२ ट्रिलिअन तर, वैयक्तिक आयकर आणि सिक्युरिटीज ट्रांजेक्शन टॅक्ससह विविध उत्पन्नांवरील करातून ७ ट्रिलिअन कराचे उद्दीष्ट्य निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा – आर्थिक वर्ष-23 च्या पहिल्या तिमाहीत भारताच्या GDP मध्ये 13.5 टक्क्यांनी वाढ

- Advertisement -

दरम्यान, गेल्या वर्षी जमा झालेल्या कॉर्पोरट करापेक्षा यंदा २५ ते २६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कर संकलनाचा दर असाच राहिला तर आपण आपलं उद्दीष्ट्य निश्चित साध्य करू शकतो असा विश्वास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा – 420 कोटींच्या करचोरीप्रकरणी प्राप्तिकर विभागाची अनिल अंबानींना नोटीस

जीएसटीचेही संकलन चांगले

एकीकडे प्रत्यक्ष कर संकलनात वाढ झालेली असताना वस्तू आणि सेवा कर संकलनातही ऑगस्ट महिन्यात २८ टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली. अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात १ लाख ४३ हजार ६१२ कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. यापैकी २४ हजार ७१० कोटी केंद्र सरकारचे जीएसटी संकलन आहे तर, ३० हजार ९५१ कोटी राज्यांची जीएसटी संकलन आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -