घरअर्थजगतठामपाची मालमत्ता करवसुली ५०० कोटी

ठामपाची मालमत्ता करवसुली ५०० कोटी

Subscribe

ठाणे : मालमत्ता कर भरण्यात यंदा ही ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवल्याने गतवर्षापेक्षा यंदा तब्बल १५० कोटींनी मालमत्ता कर वसुली प्रचंड अशी वाढ झालेली आहे. यंदा मालमत्ता कर वसुलीने गेल्या अनेक वर्षांतील विक्रम मोडीत काढले असून २०२२-२३ या वर्षातील अवघ्या आठ महिन्यात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. कळवा, वागळे इस्टेट या प्रभाग समितीपेक्षा निश्चित दिवा प्रभाग समितीत मालमत्ता कर वसुली अधिक झाल्याचे दिसत आहे. तर सर्वाधिक १७४ कोटींची कर वसुली माजीवाडा- मानपाडा या प्रभाग समितीने केली आहे.

गेल्यावर्षी या कालावधीपर्यत ३५० कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसुल झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कराची वसुली झाली आहे. असे असले तरी काही करदात्यांनी अद्यापपर्यत आपला कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पध्दतीने मालमत्ताधारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत आपला मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. ठाणेकर घरबसल्या ऑनलाईन कर भरणा करू शकतात. त्यामुळे त्यांनी या सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. तर, ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेस केलेल्या सहकार्याबद्दल आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांचे आभार व्यक्त केले आहेत.

- Advertisement -

“ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांनी त्यांच्या मालमत्तेवर कर वसुलीच्या कारवाईअंतर्गतची अप्रिय घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून आपला मालमत्ता कर महापालिकेकडे विनाविलंब भरुन महापालिकेस सहकार्य करावे.”- अभिजीत बांगर, आयुक्त, ठामपा

प्रभागसमिती निहाय वसुली तक्ता
उथळसर– ३४.४३ कोटी
नौपाडा कोपरी – ६३.१४ कोटी
कळवा- १६.९४ कोटी
मुंब्रा – १९.०५ कोटी
दिवा- १९.०३ कोटी
वागळे इस्टेट- १६.५५ कोटी
लोकमान्य सावरकर – १९.१० कोटी
वर्तकनगर – ७७.४६ कोटी
माजिवडा मानपाडा – १७३.९८ कोटी
ठाणे महापालिका मुख्यालय – ६२.४३ कोटी

- Advertisement -

एकूण – ५०२.१२ कोटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -