ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची जबरदस्त योजना, 1,11,000 रुपयांपर्यंत मिळणार पेन्शन

60 years old senior citizen government has started pension scheme
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची जबरदस्त योजना, 1,11,000 रुपयांपर्यंत मिळणार पेन्शन

जेष्ठ नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. 60 वर्षांवरील जेष्ठ नागरीकांसाठी सरकारने पीएम वय वंदना योजना सुरू केली आहे. या अंतर्गत तुम्हाला 1,11,000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. पंतप्रधान वय वंदना योजना जेष्ठांना त्यांच्या जीवनाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अर्थिक रुपाने आत्मनिर्भर बनवण्यासाठी सुरू केली गेली आहे. याचा कालावधी 31 मार्च 2020 होता. मात्र, मार्च 2023 पर्यंत या योजनेची मुदत वाढवली गेली आहे.

LIC कडे जबाबदारी –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 60 वर्षं वय असने आवश्यक आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जेष्ठ नागरीक यात गुंतवणूक करू शकतात. या योजनेत वयाची सीमा निश्चीत करण्यात आलेली नाही.या योजनेत एक व्यक्ति जास्तीत जास्त 15 लाख रुपयाची गुंतवणूक करू शकतो. या योजनेची जबाबदारी LIC ला देण्यात आली आहे. या योजनेत पेन्शनसाठी, तुम्हाला एक रकमी रक्कम गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेन्शनची निवड करू शकता.

गुंतवावे लागणार इतके पैसे –

या योजनेंतर्गत, तुम्हाला प्रति महिना 1000 रुपये पेन्शनसाठी 1,62,162 रुपये गुंतवावे लागतील. या योजनेंतर्गत, कमाल मासिक पेन्शन रु. 9,250 तिमाही, रु. 27,750, सहामाही निवृत्ती वेतन रु. 55,500 आणि वार्षिक पेन्शन रु. 1,11,000 आहे.

अधीक महितीसाठी –

PMVVY योजनेबद्दल तपशीलवार माहितीसाठी तुम्ही 022-67819281 किंवा 022-67819290 डायल करू शकता. याशिवाय, तुम्ही टोल-फ्री नंबर – 1800-227-717 देखील डायल करू शकता.

जीएसटीमधून सूट –

या योजनेला सेवा कर आणि जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे पैसे कोणत्याही गंभीर आजाराच्या किंवा जोडीदाराच्या उपचारासाठी वेळेपूर्वी काढू शकता.

ही कागदपत्रे अनिवार्य –

प्रधानमंत्री वय वंदना योजनेतील गुंतवणुकीसाठी, तुमच्यासाठी पॅन कार्डची प्रत, पत्त्याच्या पुराव्याची एक प्रत आणि बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत असणे अनिवार्य आहे.