घरअर्थजगतकसं असेल ७५ रूपयांचं नाणं?

कसं असेल ७५ रूपयांचं नाणं?

Subscribe

केंद्र सरकार लवकरच ७५ रूपयाचं नाणं चलनात आणण्याचा विचार करत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये तिरंगा फडकवलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यास्मरणार्थ ७५ रूपयांचं नाणं चलनात आणलं जाईल अशी अधिसुचना अर्थमंत्रालयानं जारी केली आहे.

५००, १०००,५०,१०० आणि २०० रूपयाच्या नवीन नोटा चलनात आल्यानंतर आता ७५ रूपयाचं नवं नाणं देखील चलनात येणार आहे. विश्वास नाही ना बसत? केंद्र सरकार लवकरच ७५ रूपयाचं नाणं चलनात आणण्याचा विचार करत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये तिरंगा फडकवलेल्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यास्मरणार्थ ७५ रूपयांचं नाणं चलनात आणलं जाईल अशी अधिसुचना अर्थमंत्रालयानं जारी केली आहे. दरम्यान, ७५ रूपयाच्या नाण्याची निर्मिती सुरू असून या नाण्याचं वजन ३५ ग्रॅम असेल. नाण्यासाठी ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे आणि प्रत्येकी ५ टक्के निकेल आणि जस्त वापरण्यात येईल.

या नाण्यावर सेल्युलर जेलच्या समोर तिरंग्याला वंदन करणाऱ्या नेताजी बोस यांचं चित्र असेल. त्याचित्राखाली ३० डिसेंबर १९४३ या तारखेचा उल्लेख असेल. याच दिवशी  नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलबाहेर तिरंगा फडकावला होता. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ ऑक्टोबरला लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला होता. त्यानंतर आता ७५ रूपयाचं नवं नाणं येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -