घरअर्थजगतकेंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट; महागाई भत्त्त्यात २५ टक्क्यांची वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट; महागाई भत्त्त्यात २५ टक्क्यांची वाढ

Subscribe

६ व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government employees) एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने त्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ करण्याची योजना आखली आहे. यासह केंद्राने Central Government and Central Autonomous Bodies च्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) २५ टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. महागाई भत्ता वाढवण्याच्या निर्णयाला एप्रिल २०२० मध्ये मंजूरी देण्यात आली.

१६४ टक्के दराने मिळतोय DA

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १ जानेवारी २०२०, १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२० मध्ये रोखला होता. यादरम्यान त्यांना १६४ टक्क्यांनी DA मिळत होता. सरकारने आता तो १८९ टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यामुळे १ जुलै २०२१ पासून लागू करण्यात आला. यापूर्वी महागाई भत्ता १६४ टक्क्यांनी देण्यात आला.

- Advertisement -

सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणार पगार

अर्थ मंत्रालयाचे डायरेक्टर निर्मला देव यांच्या मते, हा आदेश अद्यापही सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत पगार देणाऱ्या सर्व केंद्रीय सरकारी कार्यालयांसाठी (Central Government Office) जारी करण्यात आला आहे. तसेच या आदेशाची प्रत C&AG आणि UPSC सह इतर विभागांनाही पाठवण्यात आली आहे.

HRA देखील वाढेल

ऑल इंडिया अकाऊंट अँड ऑडिट कमिटीचे महासचिव, हरिशंकर तिवारी यांनी सांगितले की, सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावरील बंदी उठवल्याने पगारामध्ये वाढ होईल. याचा प्रभाव हाऊस रेंट अलाउंसवर देखील होईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7th Pay commission) शहरांनुसार, HRA मध्ये २७ टक्के, १८ टक्के आणि ९ टक्के अशी वाढ केली आहे. हे वर्गीकरण X, Y आणि Z Class असे शहरांनुसार करण्यात आले आहे. याचा अर्थ  X Class शहारात राहणाऱ्यांना अधिक HRA मिळेल. यानंतर Y Class आणि नंतर Z Class वाल्यांना मिळेल.

- Advertisement -

अफगाणिस्तानातील नागरिकांसाठी E-emergency X-Misc visa, गृहमंत्र्यांकडून visa नियमात बदल


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -