घरअर्थजगत7th Pay Commission: खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार

7th Pay Commission: खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढणार पगार

Subscribe

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला आनंदाची बातमी मिळणार आहे. लवकरात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचे थकबाकी मिळू शकते. याचा एक कोटींहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना ३१ टक्के महागाई भत्ता (DA/DR Hike) मिळत आहे. गेल्या १८ महिन्यांपासून त्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी होती. या भत्त्याच्या थकबाकीबाबत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते.

माहितीनुसार, मोदी सरकार महागाई भत्त्यामध्ये (Dearness Allowance) पुन्हा एकदा तीन टक्क्यांनी वाढ करू शकते. याबाबत येत्या बुधवारी होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) चर्चा केल्यानंतर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. या बैठकीमध्ये डीए थकबाकीवर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर यावर अंतिम निर्णय झाला तर सरकार कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक लाखापासून ते दोन लाख दरम्यान थकबाकी मिळेल. शिवाय पगारातही मोठी वाढ होईल.

- Advertisement -

सरकारच्या निर्णयानंतर ज्या लोकांना याचा फायदा होईल, त्यामध्ये ४८ लाख केंद्रीय कर्मचारी आहे, तर ६० लाख पेन्शनधारक आहेत. गेल्या वर्षी अर्थ मंत्रालयासोबत नॅशनल काऊंसिल ऑफ जेसीएम (NCJCM) आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग (DoPT) एक बैठक झाली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांचा थकबाकी डीए देताना १८ महिन्यांची थकबाकी डीएची रक्कम देण्याबाबतही चर्चा झाली होती. पेन्शनधारक फोरमच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले होते.

पंतप्रधानांना लिहिल्या पत्रामध्ये भारतीय पेन्शनधारक फोरमने डीए पेमेंट प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. १ जानेवारी २०२० पासून ३० जून २०२१ पर्यंत DA/DRची थकबाकी लवकरात लवकर अदा करण्याचे निर्देश अर्थ मंत्रालयाला देण्याची विनंतीही पंतप्रधानांना पत्राच्या माध्यमातून करण्यात आली होती. उत्तर प्रदेशसह ५ राज्यांमध्ये होणारी निवडणुका पाहता पंतप्रधान मोदी या विषयात लक्ष घालण्याची शक्यता असून ते पुढाकारही घेतली.

- Advertisement -

हेही वाचा – PPF: 500 रुपयांची गुंतवणूकही बनवू शकते तुम्हाला करोडपती, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेचे फायदे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -