…अन्यथा दुप्पट दंड भरा, आधार-पॅन लिंकप्रकरणी महत्त्वाची बातमी

आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक (Adhar Card-Pan card Link) नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. १ जुलैनंतर तुम्ही आधार कार्ड – पॅन कार्ड लिंक करायला गेल्यास तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. ही मुदत आधी १ जूनपर्यंत देण्यात आली होती. मात्र, केंद्र सरकारने ही मुदत पुन्हा एकदा वाढवली असून ३० जूनपर्यंत तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकता.

१ एप्रिल २०२२ पासून आधार कार्ड पॅन कार्डसोबत जोडण्यासाठी ५०० रुपये दंड भरावा लागत आहे. मात्र, ३० जूनपर्यंत लिंक न केल्यास हा दंड दुप्पट (Double charged) करण्यात येणार आहे. म्हणजेच, ३० जूननंतर आधार कार्ड लिंक करायला गेल्यास तुम्हाला एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) अनेकवेळा मुदतवाढ दिली होती. ३१ मार्चपर्यंत ही प्रक्रिया मोफत देण्यात आली होती. मात्र, १ एप्रिलपासून ५०० रुपये दंड आकारण्यास सुरुवात केली.

लिंक नसेल तर काय होईल?

तुम्ही आधार कार्ड-पॅन कार्ड लिंक केले नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय केले जाणार आहे. पॅन कार्ड रद्द झाले तर इतर आयकराशी संबंधित तुमची सर्व कामे ठप्प होतील. तसेच, इतर अनेक सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही.

असं करा लिंक

सर्वांत आधी https://incometaxindiaefiling.gov.in या संकेस्थळाला भेट द्या.

या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला Link Adhar नावाचा पर्याय असेल.

या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्ही आवश्यक ते तपशील प्रविष्ट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी संबंधित रकान्यात समाविष्ट केल्यानंतर तुमचं पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक केले जाईल.