घरअर्थजगतअ‍ॅमेझॉनकडून प्राइम डे २०१९ ची घोषणा

अ‍ॅमेझॉनकडून प्राइम डे २०१९ ची घोषणा

Subscribe

१५ आणि १६ जुलै रोजी खूप सवलती

यंदाच्या जुलै महिन्यामध्ये आजवरच्या सर्वाधिक काळ सुरू राहणार्‍या सवलती प्राइम डेच्या निमित्ताने अ‍ॅमेझॉन आपल्या जगभरातील प्राइम सदस्यांना देणार आहे. मोठमोठ्या सवलतींचा लाभ घेण्याची संधी. भारतामध्ये यंदा आपले तिसरे वर्ष साजरे करणारा अ‍ॅमेझॉनचा प्राइम डे सोमवारी १५ जुलै रोजी मध्यरात्री सुरू होणार असून – यंदा प्रथमच तो ४८ तास सुरू राहणार आहे ज्यात सदस्यांना सर्वोत्तम खरेदी, बचत आणि मनोरंजनाचा आनंद लुटण्यासाठी तब्बल दोन संपूर्ण दिवस मिळणार आहेत. प्राइम सदस्यांना अ‍ॅमेझॉनवरील वर्षभरातील सर्वात कमी किमती, १,००० हून अधिक नवीन प्रोडक्ट लाँचेस आणि अभूतपूर्व मनोरंजन यांची मौज अनुभवता येणार आहे.

भारतासह जगभरातील १८ देशांतील १० कोटी प्राइम सदस्य प्राइम सेवेचा आस्वाद घेतात. तुम्ही अजूनही प्राइम मेंबर बनला नाहीत का? तर मग amazon.in/primeday येथे मासिक १२९ रुपये वर्गणी भरून तुम्ही मोफत आणि वेगवान घरपोच डिलिव्हरी, अमर्याद व्हिडिओ, जाहिरातींच्या अडचणींशिवाय गाणी ऐकण्याची सोय, खास सवलती आणि अशा कितीतरी सेवांचा लाभ घेऊ शकता. प्राइम नाऊ सेवेद्वारे बेंगळुरू, मुंबई, नवी दिल्ली आणि हैदराबाद येथील सदस्यांना मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक्स, अ‍ॅमेझॉन डिवाईसेस, दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि अशा कितीतरी उत्पादनांची अल्ट्रा-फास्ट, अवघ्या दोन तासांत डिलिव्हरी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -