Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत वाढती महागाई रोखण्यासाठी यूएस फेडरल बँकेचा मोठा निर्णय; व्याज दरात ०.७५ टक्क्यांची...

वाढती महागाई रोखण्यासाठी यूएस फेडरल बँकेचा मोठा निर्णय; व्याज दरात ०.७५ टक्क्यांची वाढ

Subscribe

सतत महागाई वाढत आहे आणि त्यावरच नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका फेडरल बँकेने ही दरवाढ केली आहे.

अमेरिकेच्या फेडरल बँकेने(us federal bank) पुन्हा एकदा व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सतत वाढणाऱ्या महागाईचा विचार करता फेडरल बँकेने हा मोठा निर्णय घेतला. महागाई वाढत असल्यामुळे फेडरल बँकेने तिसऱ्यांदा ही व्याजदरात वाढ केली आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेडरल बँकेने ही व्याजदरवाढ केली आहे.

हे ही वाचा – साहेबराव देशमुख आणि सांगली सहकारी बँकांवर आरबीआयचे निर्बंध

- Advertisement -

सतत महागाई वाढत आहे आणि त्यावरच नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिका फेडरल बँकेने ही दरवाढ केली आहे. या आधीही जून महिन्यात व्याजदरात वाढ झाली होती. मागील २८ वर्षातील ती सर्वाधिक दरवाढ ठरली होती. जून मध्ये दरवाढ केल्यांनतर महागाई नियंत्रणात येऊ शकली नाही आणि म्हणूनच या महिन्यात (जुलै) मध्ये पुन्हा एकदा व्याजदरात ०. ७५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय अमेरिकी अफेडरल बँकेने(us federal bank) घेतला आहे. अमेरिका फेडरल बँकेकडून दरवाढ होणार असा अंदाज अर्थ तज्ञांनी आधीच वर्तवला होता. असंही सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा –  स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, गोल्ड बाँड योजना २० जूनपासून सुरू

- Advertisement -

यूएस फेडरल बँकेने केलेल्या वाढीनंतर अमेरिकन शेअर बाजारातील(us share market) प्रमुख निर्देशांक, नॅस्डॅक, डाऊ जोन्स आणि एनवायएसईमध्ये वाढ झाली. यूएस फेडरल बँकेने केलेल्या या दरवाढीच्या निर्णयाचे स्वागत अमेरिकेच्या शेअर बाजाराने सुद्धा केले आहे. या द्रवाढीसोबत सोने आणि चांदीच्या दारातही वाढ झाली आहे. त्याच सोबत कच्च्या तेलाचे भाव सुद्धा वधारले आहेत.

दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही आर्थिक घडामोडी घडल्या की त्याचा परिणाम का इतर काही देशांवरही होत असतो. भारतात(india) सुद्धा गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

हे हा वाचा –  डाॅलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, एका डाॅलरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -