घरअर्थजगतBudget 2023 : यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग होणार? वाचा सविस्तर...

Budget 2023 : यंदाच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग होणार? वाचा सविस्तर…

Subscribe

सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत आणि काही लोक हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. २०२३-२०२४ मध्ये काय स्वस्त होणार आहे आणि काय महाग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर या माहितीवर एक नजर टाकूया...

१ फेब्रुवारी २०२३ रोजी निर्मला सीतारामन या सर्वसामान्यांसाठी २०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि केंद्रीय अर्थसंकल्प येण्याआधी पुढील आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये काय स्वस्त होणार आहे आणि काय महाग होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तुम्हालासुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर या माहितीवर एक नजर टाकूया…

दरवर्षी अर्थसंकल्प येण्यापूर्वीच Budget Expectations म्हणजेच अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत, यावर चर्चांना उधाण येऊ लागते. सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकल्पाकडून खूप आशा आहेत आणि काही लोक हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. यावेळच्या अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या आयात वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. यामुळे सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेला आणखी बळ मिळेल आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळेल. सरकार ३५ वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करेल अशी शक्यता आहे. या वस्तूंच्या किमती वाढल्याने मेक इन इंडिया उत्पादनांची विक्री वाढवण्यासही मदत मिळेल.

- Advertisement -

काय स्वस्त होणार?
सरकार आयात कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना मिळावी म्हणून एकूण ३५ वस्तूंवर कस्टम ड्युटी वाढवण्याची तयारी करत आहे. खाजगी जेट, हेलिकॉप्टर, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, हाय ग्लॉस कागद आणि व्हिटॅमीन सारख्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. देशात या वस्तू मोठ्या प्रमाणात बनवल्या जाव्यात यासाठी त्यांची आयात महाग करण्याची शक्यता आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने विविध मंत्रालयांना अत्यावश्यक नसलेल्या आयात वस्तूंची यादी तयार करण्यास सांगितले होते, ज्यावर कस्टम ड्युटी वाढविली जाऊ शकते. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत चालू खात्यातील तूट गेल्या 9 महिन्यांतील उच्चांकी ४.४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

- Advertisement -

अर्थसंकल्पात डायमंड पॅकेजच्या घोषणांची मागणी

रत्नं आणि दागिने स्वस्त होऊ शकतात. यंदाच्या बजेटमध्ये सरकार दागिन्यांच्या क्षेत्राला दिलासा देण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाच्या आयातीपासून ते तयार दागिन्यांच्या निर्यातीपर्यंत अनेक गोष्टीत फायदा मिळू शकतो. जेम्स अँड ज्वेलरी निर्यातदारांनी लॅबमधल्या हिऱ्यांच्या कच्च्या मालावरचं सीमाशुल्क रद्द करावं अशी मागणी केलीय. तसंच ज्वेलरी रिपेअर पॉलिसीच्या घोषणेचीही मागणी केलीय. या अर्थसंकल्पात डायमंड पॅकेजची घोषणा करण्याची मागणीही करण्यात आलीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -