घरअर्थजगतपालकांनी SIPमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 21व्या वर्षी मुले होणार करोडपती; वाचा काय आहे फॉर्म्युला?

पालकांनी SIPमध्ये गुंतवणूक केल्यानंतर 21व्या वर्षी मुले होणार करोडपती; वाचा काय आहे फॉर्म्युला?

Subscribe

मुंबई : प्रत्येकाला कमावलेले पैसे वाचवायचे असतात आणि ते योग्य ठिकाणी गुंतवायचे स्वप्न असते. सर्वसामान्यांचे पैसे सुरक्षित असतील आणि त्यांना चांगला परतावा मिळेल. तर काही लोक त्यांच्या म्हातारपणसाठी पैसे साठवून ठेवतात. तर काही लोक त्यांच्या मुलांसाठी पैसे जमा करतात की, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार नाही. तुम्हालाही तुमच्या मुलाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP द्वारे करोडपती बनण्याची भेट देऊ शकता. यामुळे तुमची मुले ही वयाच्या 21 वर्षाचे झाल्यानंतर ते करोडपती असतील.

प्रत्येक पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी असते आणि त्यासाठी ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी फंडची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात. मुलांसाठी मोठा फंड जमा करण्यासाठी म्युच्युअल फंड एसआयपी हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो. परताव्याचा इतिहास पाहल्यानंतर लक्षात येईल की, आज त्यात गुंतवणूक केल्याने वयाच्या 21व्या वर्षी तुमचे मुले करोडपती होऊ शकतात, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यासाठी एक विशेष गुंतवणूक फॉर्म्युला आहे. ज्या अंतर्गत तुम्हाला दरमहा बचत आणि गुंतवणूक करावी लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – CMIE report : बेरोजगारी अडीच वर्षांतील उच्चतम पातळीवर, ग्रामीण भागात सर्वाधिक प्रमाण

दीर्घकाळासाठी एसआयपी खूप फायदेशीर

तुम्ही तुमच्या मुलांसाठी जितक्या लवकर गुंतवणूक करणार, ते त्यांच्यासाठी तितके फायदेशीर असते. तज्ञांच्या मते, आज दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एसआयपी हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये मिळालेल्या रिटर्न्सवर नजर टाकली तर अनेक एसआयपीचे रिटर्न्स 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. सरासरी, परताव्याचा दर 12 ते 16 टक्क्यांपर्यंत आहे, अशा रिटर्न्ससहही तुमची ठराविक रकमेची गुंतवणूक करोडो रुपयांच्या फंडात बदलू शकते.

- Advertisement -

हेही वाचा – पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी 18 ट्रेडमध्ये आतापर्यंत 76,000 अर्ज

मुलांना करोडपती होण्याचा असा आहे फॉर्म्युला

मुलांचा जन्म होताच, त्यांच्या पालकांनी दरमहा 10,000 रुपये एसआयपी करावे लागेल. यानंतर मुलांच्या 21 वर्षेपर्यंत सुरू ठेवावे, जेणेकरून तुमची गुंतवणुकीची रक्कम 25,20,000 रुपये होईल. यात आपण असे गृहीत धरून चालू की, तुम्हाला सरासरी 16 टक्के परतावा मिळतो, 20 टक्के नाही. तर या प्रकरणात तुम्हाला मिळणारी परतावा रक्कम 1,81,19,345 रुपये असेल. यानुसार 21 वर्षांत तुमचा एकूण निधी 2,06,39,345 रुपये ऐवढा होईल. या कालावधीत केवळ 12 टक्के परतावा मिळाला. तरी देखील तुमची मुले करोडपती होतील. करण त्यांच्या खात्यात 1,13,86,742 रुपये असेल.

हेही वाचा – 1 नोव्हेंबरपासून आर्थिक नियमांत बदल; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार चाप

एसआयपीमध्ये गुंतवणूक वाढते

शेअर बाजारात चढ-उतार पाहयला मिळत असेल तरी म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदार सकारात्मक आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2023 मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधील गुंतवणूकदारांची संख्या ( SIP) याद्वारे गुंतवणुकीने 16,000 कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबरमध्ये ते 16,420 कोटी रुपये होते, जे आधी ऑगस्ट महिन्यात 15,814 कोटी रुपये होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -