Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत सिबिल स्कोअर म्हणजे काय रे भाऊ!

सिबिल स्कोअर म्हणजे काय रे भाऊ!

Subscribe

शेतकरी बांधवाना पीक कर्जाकरिता बँकांना सिबिल स्कोअर मागितला, तर त्या बँकांवर तत्काळ एफआयआर दाखल करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई | शेतकरी (Farmer) बांधवाना पीक कर्जाकरिता (Crop Loan) बँकांना सिबिल स्कोअर (CIBIL Score) मागितला, तर त्या बँकांवर तत्काळ एफआयआर दाखल करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. राज्यातील काही बँका (Bank) हे पीक कर्जासाठी शेतकरी बांधवांची अडवणूक करतात. अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढाव बैठक उपमुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही बँका शेतकरी बांधवांना पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर मागितला जातो. आज अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश दिले की, पीक कर्जासाठी जर बँकांनी सिबिल स्कोअर मागितले तर त्या बँकांवर एफआयआर दाखल करा.”

- Advertisement -

 सिबिल स्कोअर म्हणजे नक्की काय

सिबिल स्कोअर हा तुमच्या कर्जाच्या नियमित परतफेडीवर संबंधित व्यक्तीची पत ठरवली जाते. ज्यांचा सिबिल स्कोअर हा किमान ६०० ते ७०० पर्यंत असणाऱ्या शेतकऱ्यांनाच बँकांमार्फत कर्जवाटप केले जाते. साधारणतः . ३०० हा सर्वात कमी तर ९०० हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर मानला जातो. आरबीआयच्या निकषानुसार, आता पीककर्ज किंवा मध्यम व दीर्घ मुदतीच्या सिबिलचा निकष लागू करण्यात आला असून बँकांकडून पीक कर्ज मिळवण्यासाठी ७/१२, ८अ, ६-ड, पॅन कार्ड, आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे मागितील जातात.

- Advertisement -

नोकरदार असो वा शेतकरी त्यांना बँकांकडून कर्ज घेतल्यास किंवा संबंधित व्यक्ती कोणाला जामीनदार झाल्यास त्यांची संपूर्ण माहिती बँका सिबिल स्कोअरच्या माध्यमातून कळू शकते. त्या व्यक्तीने कोणत्याही बँकेची थकबाकीदार असेल, ज्या व्यक्तीला जामीनदार आहेत, ती व्यक्ती कर्जाची नियमित परतफेड करते का यांची माहिती त्यामध्ये असते. कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले आणि नियमित पणे परतफेड होत असेल, तर असाच शेतकरी कर्जासाठी पात्र ठरतोय आणि थकबाकीदार असलेला व्यक्ती कर्ज मिळत नाही.

 

- Advertisment -