घरअर्थजगत'मार्च अखेर ७० हजार कोटींची थकीत कर्ज वसुली होणार'

‘मार्च अखेर ७० हजार कोटींची थकीत कर्ज वसुली होणार’

Subscribe

मार्च २०१९ पर्यंत ७० हजार कोटींची कर्जवसुली झालेली असेल अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे.

वाढतं थकीत कर्ज आणि कर्ज बुडव्यांमुळे बँकांच्या एनपीएमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सरकारवर देखील चौफेर टीका होत आहे. आत्तापर्यंत विजय माल्ल्या, मेहुल चोक्सी सारख्या बड्या धेंडांनी बँकांना करोडो रूपयांचा चुना लावला आहे. त्यानंतर हे उद्योगपती परदेशी देखील पसार झाले. शिवाय, उद्योगपतींच्या बाबतीत सरकार सापत्न वागत असल्याची टिका देखील सरकारवर करण्यात येत आहे. थकीत कर्जामुळे बँकांची आर्थिक स्थिती देखील ढासळत असल्याची बाब देखील आता समोर येत आहे. यावर आता अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मार्च अखेर पर्यंत कर्मशिअल बँका ७० हजार कोटींची कर्ज वसुली करतील अशी माहिती यांनी दिली आहे. यामध्ये १२ मोठ्या प्रकरणांचा देखील समावेश आहे. या साऱ्या प्रकरणांचा मार्च अखेर पर्यंत निकाल लागलेला अशी माहिती अरूण जेटली यांनी आपल्या फेसबुकवर लिहिलेल्या ब्लॉगमधून दिली आहे.

अरूण जेटली यांनी ही माहिती दिल्यानंतर बँकांनी नेमकी किती कर्ज वसुली केली यासाठी किमान एप्रिल २०१९ची वाट पाहावी लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -