घरअर्थजगतमहागाईत भर, कर्जाचा हप्ता वाढणार

महागाईत भर, कर्जाचा हप्ता वाढणार

Subscribe

रिझर्व्ह बँकेची व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ

देशातील जनता महागाईने आधीच त्रस्त झाली असताना आता पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने व्याज दरात वाढ करुन नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे. तब्बल साडे चार वर्षांनी भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआयने रेपो रेटच्या दरात पाव टक्क्यांनी वाढ केल्याने तुम्ही काढलेले गृह, वैयक्तिक आणि वाहन कर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता आहे. शिवाय सर्वसामान्यांना बँकेतून कर्ज घेणे सुद्धा महाग पडणार आहे. व्याजाचा दर आणि रेपो रेट पाव टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्के केला आहे.

रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढला

आरबीआयने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली असून हा रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी वाढला आहे. तर रिव्हर्स रेपो रेट ०.२५ टक्क्यांची वाढ नोंदवून तो ६ टक्क्यांपर्यंत गेला आहे. अन्य बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. त्यावर रिझर्व्ह बँक व्याजदर आकारते त्याला रेपो रेट असे म्हणतात. जर रेपो रेट कमी झाला, तर इतर बँकाना रिझर्व्ह बँकेला कमी व्याज द्यावं लागतं. त्याउलट रेपो रेट वाढला तर इतर बँकांना आरबीआयला जास्त व्याज द्यावं लागतं. त्यामुळे जर बँकांना फायदा झाला, तर बँका ग्राहकांनाही व्याजदर कपात करून फायदा मिळवून देता. मात्र जर तोटा झाला तर तोही ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. म्हणजेच वाढलेल्या रेपो दराचा सर्वसामान्य कर्जदारालाच फटका बसतो. गेल्या दोन महिन्यापूर्वी देखील दोन सदस्यांनी पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती. मात्र आज पुन्हा एकदा घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये सर्वच्या सर्व सदस्यांनी दरवाढीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं आणि एकमतानं ही वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

गृह,वाहन आणि वैयक्तिक कर्जात वाढ

आरबीआयने केलेल्या दरवाढीमुळे भविष्यातील सर्व कर्जांचे दर वाढू शकणार आहेत. गृह,वाहन आणि वैयक्तिक कर्जात दर वाढण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली की बँका हा वाढीव बोजा ग्राहकांकडे वसुल करत असल्याने मोठी सरकारी बँक प्रथम व्याजदरात वाढ करते मग मागोमाग सगळ्या बँकांचे कर्जही महागते. जर असेच सुरू राहिले तर नक्कीच गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जात आणि अन्य प्रकारचे कर्जेही महागण्याची शक्यता आहे.

एमसीएलआर ०.१ टक्क्यांनी वाढवला

गेल्या आठवड्यातच स्टेट बँक, पंजाब नॅशनल व आयसीआयसीआय बँकेने कर्जाचा दर ०.१ टक्क्यांनी वाढवला होता. बहुतेक सर्व प्रकारची कर्जे या एमसीएलआरशी जोडलेली असतात आणि त्यात होणारे बदल कर्जाच्या व्याजात किंवा हप्त्यात उमटतात. त्यामुळे एमसीएलआर किंवा प्रमाण दर वाढला की ईएमआय वाढतो. बुधवारच्या व्याजदर वाढीनंतर किती बँका हा प्रमाण दर वाढवणार यामुळे किती कर्जे महागतील? हे दिसून येणार आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -