घरअर्थजगतCryptocurrency Earning : Cryptocurrency ची किमया ९ वर्षांची बहिण, अन् १४ वर्षांचा...

Cryptocurrency Earning : Cryptocurrency ची किमया ९ वर्षांची बहिण, अन् १४ वर्षांचा भाऊ झाला कोट्याधीश

Subscribe

Siblings Earning From Cryptocurrency: ईशान ठाकूर आणि अनन्या ठाकूर ही दोघही भारतीय वंशाची भावंडे सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. ईशान १४ वर्षांचा आहे तर त्याची बहिण अनन्या ९ वर्षांची आहे. या दोघांनी गेल्या सात महिन्यांत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तब्बल कोट्यावधी रुपये कमावले आहेत. क्रिप्टोकरन्सीच्या किमयाने दोघांनी आत्तापर्यंत १ कोटी १९ लाख रुपयांची  कमावलेत. एकट्या ऑक्टोबर महिन्यात त्यांनी सुमारे ४७ लाख ६१ हजार रुपयांची कमाई केली आहे.

टेक्सासमध्ये राहताय सध्या हे बहिण, भाऊ

एका रिपोर्टनुसार, ईशान आणि अनन्या अमेरिकेतील टेक्सास शहरात सध्या राहतात. ईशान सध्या हायस्कूलमध्ये असून भविष्यात त्याला यूपीएनमध्ये मेडिसिनचे शिक्षण घ्यायचे आहे. ईशानची बहीण अनन्या अजून चौथीत शिक्षण घेतेय. अनन्याला भविष्यात न्यूयॉर्क विद्यापीठातून मेडिकलचे शिक्षण घ्यायचे आहे.

- Advertisement -

सुट्ट्यांच्या दिवसांत करायचे गुंतवणूक

या दोघांनी प्रथम त्यांच्या शाळेच्या सुट्ट्यांमध्ये बिटकॉइन आणि एथेरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. पहिल्या दिवशी दोघांनी २२३ रुपये कमावले. पैसे मिळवण्याची ही प्रक्रिया काही दिवस अशीच चालू राहिली. पण काही खास कमाई नाही झाली. परंतु नंतर कमाई वेगाने वाढली.

YouTube अन् इंटरनेटवरून घेतली क्रिप्टोकरन्सीची माहिती

आता ईशानने त्याच्या एलियनवेअर कॉम्प्युटरमध्ये ग्राफिक कार्ड इन्स्टॉल करून इथर मायनिंग रिगमध्ये त्याचे रुपांतर केले आहे. क्रिप्टोकरन्सीच्या हायफाय साइट्स चालवण्यासाठी त्याने हा बदल केला. ईशानने यूट्यूब आणि इंटरनेटवरून क्रिप्टोकरन्सीशी संबंधित माहिती घेतली. अशा प्रकारे त्यांनी गुंतवणूकायचे शिक्षण घेतले.

- Advertisement -

एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोकरन्सीमध्ये केली ट्रेडिंग

दोन्ही भावंडांनी एप्रिल २०२१ पासून क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रथम त्यांनी ३ डॉलर्स म्हणजे सुमारे २२५ रुपये कमावले. परंतु त्यांनी ही गुंतवणूक चालूच ठेवली. परिणामी, पहिल्या महिन्याच्या अखेरीस त्यांना सुमारे ७४ हजार रुपये मिळाले.

दोघांनाही स्वत:वर गर्व

यात दोघांनी एप्रिल २०२१ मध्येच Fliffer Technologies ही कंपनी सुरू केली. यावर ईशान म्हणाला की, तो आता चांगला पैसा कमावत असला तरी त्याला आजही त्याचा तेवढाच अभिमान आहे जितका तो दिवसाला २२३ रुपये कमवत होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -