घरअर्थजगतअवघ्या १५ दिवसांत ५०० रुपयांच्या ८ कोटी नोटांची छपाई!

अवघ्या १५ दिवसांत ५०० रुपयांच्या ८ कोटी नोटांची छपाई!

Subscribe

नाशिकमधील करन्सी नोट प्रेसने गेल्या १५ दिवसांत नोटांची छपाई ४० टक्क्यांनी वाढवून ५०० रुपयांच्या सुमारे ८ कोटी नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे सोपवल्या. करन्सी नोट प्रेस दरदिवशी एक कोटी नोटांच्या जागी १.४ कोटी नोटा छापते. काही काळापूर्वी देशाच्या अनेक भागात उद्भवलेल्या क्रॅश-क्रंचची परिस्थिती पाहून हा बदल करण्यात आला.
प्रेस सध्या दरदिवशी ५०० च्या ८० लाख आणि ५० रुपयांच्या ६० लाख नोटा छापत असून सरकारी सुट्टी आणि रविवारीही काम आहेत. महाराष्ट्र दिनीदेखील छपाईचे काम सुरु होते. १ एप्रिलपासून छपाई प्रतिदिन १.८ कोटी नोटांवरुन घसरुन प्रतिदिन १ कोटी नोटांवर पोहोचली होती. प्रशासनाच्या निर्देशानंतर छपाई वाढवून १.४ कोटी नोटा प्रतिदिनपर्यंत पोहोचली.

आरबीआयाच्या निर्देशाची प्रतीक्षा
आरबीआयने नोव्हेंबर २०१७ पासून एप्रिल २०१८ पर्यंत प्रेसला नवा कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळे इथे ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली जात नव्हती. आरबीआयकडून नव्या डिझाईनच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेसने एप्रिलपासून १०० आणि २० रुपयांच्या नोटाही छापलेल्या नाहीत. २०० रुपयांच्या नोटांच्या छपाईचा आदेश मध्य प्रदेशच्या प्रेसला दिल्याने नाशिकमध्ये ह्या नोटांचीही छपाई बंद होती.

- Advertisement -

एप्रिलच्या मध्यापर्यंत ५०० च्या नव्या नोटांची छपाई सुरु करण्यात आली. या नोटा बाजारात येण्यासाठी एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ लागला. आता दरदिवशी ५०० रुपयांच्या ८० लाख नोटां छापल्या जातात. काही दिवसांतच दरदिवशी १.२ कोटी नोटा छापण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या नाशिकमधील प्रेसमध्ये ५० आणि ५०० रुपयांच्या नोटांचीच छपाई सुरु आहे.

कॅश-क्रंचमुळे नागरिक अडचणीत
काही दिवसांपूर्वी देशाच्या विविध राज्यांमध्ये एटीएममधून पैसे येत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि गुजरातच्या अनेक शहरांमधील एटीएममधून रोकड संपली होती.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -