घरअर्थजगतविमानात मास्क न घातल्यास आता सरळ बाहेरचा रस्ता, दंडही भरावा लागणार; दिल्ली...

विमानात मास्क न घातल्यास आता सरळ बाहेरचा रस्ता, दंडही भरावा लागणार; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

Subscribe

प्रभारी मुख्य न्यायाधीश विपिन सांघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश देताना म्हटले की, कोविड महामारी अद्याप संपलेली नाही आणि ती सतत डोके वर काढत आहे. कोविडशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर त्यांना दंडही ठोठावला पाहिजे.

मास्क (mask) न घातल्यास आता विमानाने प्रवेश करता येणार नाही. विमानतळ आणि विमानांमध्ये (plane) मास्कची सक्ती करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने ( Delhi High Court) दिले आहेत. तसेच मास्क न घालणाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्यात यावा, असे आदेश  न्यायालयाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला ((DGCA – डीजीसीए) दिला आहे.

प्रभारी मुख्य न्यायाधीश विपिन सांघी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा महत्त्वाचा आदेश देताना म्हटले की, कोविड महामारी अद्याप संपलेली नाही आणि ती सतत डोके वर काढत आहे. कोविडशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर त्यांना दंडही ठोठावला पाहिजे. नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी आणि आवश्यकता भासल्यास उल्लंघन करणाऱ्यांना ‘नो फ्लाईंग झोन’ मध्ये समाविष्ट करावे. तर फक्त अन्न खाताना मास्क काढण्यास सूट देण्यात आली आहे, असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) वकिलांनी न्यायालयाला सांगितले.

- Advertisement -

विमान आणि विमानतळावर कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाच्या अनुभवाच्या आधारे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.  न्यायमूर्ती सी हरी शंकर यांना विमानतळावरून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनी मास्क घातले नसल्याचे दिसून आले होते. या याचिकेवरील सुनावणी वेळी न्यायालयाने विमान आणि विमानतळावर मास्कची सक्ती करण्याचे आदेश दिले. विमानतळावरील मास्क आणि हँड सॅनिटायझेशनच्या नियमांचे उल्लंघन करणारे प्रवासी आणि इतरांवर कठोर कारवाई करण्यासाठी डीजीसीएला स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

खंडपीठाने सांगितले की, डीजीसीएने एअरलाइन्सना स्वतंत्र बंधनकारक सूचना जारी कराव्यात, जेणेकरून ते कर्मचारी, एअर होस्टेस, कॅप्टन, पायलट आणि इतर कर्मचारी विमानतळ आणि विमानात त्या प्रवाशांना पुरवू शकतील. मास्क घालणे आणि हात धुणे यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करा.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -