घरअर्थजगतDiwali Bonus Investment Tips : 'दिवाळी बोनस' फॉलो करा टिप्स, खिसा होणार...

Diwali Bonus Investment Tips : ‘दिवाळी बोनस’ फॉलो करा टिप्स, खिसा होणार नाही खाली

Subscribe

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना आता बोनस जाहीर दिला जाईल. अनेक कर्मचारी दिवाळी बोनसची आपल्या अनेक गरजांसाठी वापर करतात. तर अनेक जण बचत करतात. मात्र काही जण दिवाळी बोनसचे पैसे गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत.

त्यामुळे बोनसचे पैसे अगदी काळजीपूर्वक वापरल्यास त्यातून तुम्हाला बरेच आर्थिक फायदे मिळू शकतात. यासाठी काही  टिप्स फॉलो करत तुम्ही ‘दिवाळी बोनस’ वापरलात तर तुमचा खिशाखाली होणार नाही. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही दिवाळी बोनस कुठे आणि कसा वापरू शकता हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

- Advertisement -

ऑप्टिमा मनी मॅनेजरचे संस्थापक आणि सीईओ पंकज मठपाल यांच्या मते, दिवाळी बोनसची रक्कम मिळण्याआधीच अनेकांनी ते कुठे खर्च करायचे याचा प्लॅन बनवलेले असतात. परंतु तरीही त्या पैशातील काही रक्कम बचत करण्याचा प्रयत्न करायला हवा.

याशिवाय बोनसच्या रकमेतील गरजेची रक्कम खर्च करुन उरलेली बोनस रक्कम टॉप अप देखील करु शकता. जर तुम्ही SIP किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक प्लॅनमध्ये गुंतवणूक केली असेल तर बोनसची उर्वरित रक्कम तुम्ही त्या प्लॅनमध्ये टाकू शकता.

- Advertisement -

याशिवाय कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी देखील बोनसची रक्कम देखील वापरू शकता. जर तुम्ही पर्सनल लोन, क्रेडिट कार्डची थकबाकी किंवा इतर कोणतेही कर्ज घेतले असल्यास बोनसची रक्कम त्यासाठी वापरू शकता.

तुमची बोनस रक्कम विमा योजना खरेदी करण्यासाठी देखील वापरू शकता. भविष्यातील आर्थिक संकट लक्षात घेता विमा योजना मदत करतात. आपण पेन्शन योजनेत बोनसची रक्कम देखील गुंतवू शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -