घरअर्थजगतपेन्शन खातेधारकांना केंद्राकडून दिवाळीचे गिफ्ट, PF खात्यात जमा होईल...

पेन्शन खातेधारकांना केंद्राकडून दिवाळीचे गिफ्ट, PF खात्यात जमा होईल…

Subscribe

पेन्शन खातधारेकांची दिवाळी गोड करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असणाऱ्या पेन्शनवरील व्याज आता पेन्शन खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : पेन्शन खातधारेकांची दिवाळी गोड करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असणाऱ्या पेन्शनवरील व्याज आता पेन्शन खात्यावर जमा करण्यात येणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये म्हणजेच PF च्या खात्यामध्ये व्याज जमा करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी पीएफ खात्यातील गुंतवणुकीवर 8.15 टक्के इतका व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. तर, ज्यांच्या खात्यांवर अद्याप ही रक्कम जमा झाली नाही, त्यांच्या खात्यावर ती जमा होण्यास वेळ लागू शकतो, असेही सांगण्यात आले आहे. (Diwali gift from Central Government to pension account holders, PF account will be credited)

हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने पंजाबच्या राज्यपालांना फटकारले; तुम्ही आगीशी खेळत आहात…

- Advertisement -

थकित पेन्शन खात्यावरील व्याज आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतची प्रक्रियेला देखील सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, जेव्हा व्याज जमा होईल तेव्हा संपूर्ण व्याज खात्यात क्रेडीट करण्यात येईल. तर, कर्मचाऱ्यांनी संयम ठेवावा, ईपीएफओनुसार व्याजात कोणतीही कपात केली जाणार नसल्याने पेन्शनधारकांनी कोणतीही चिंता करू नये, असेही ईपीएफओकडून सांगण्या आले आहे. तर, केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव सांगितले की, यापूर्वीच 24 कोटींहून अधिक खात्यांमध्ये व्याज जमा करण्यात आले आहे. एकदा व्याज जमा झाल्यास ते सदस्यांच्या पीएफ खात्यात दिसून येईल. तसेच, कोणतीही व्यक्ती भविष्य निर्वाह निधी खात्यातील शिल्लक – टेक्स्ट मेसेज, मिस्ड कॉल, उमंग ॲप आणि EPFO वेबसाइट यांसारख्या अनेक प्रकारे तपासू शकते.

महत्त्वाची बाब म्हणजे, PFचा व्याजदर हा दरवर्षी अर्थ मंत्रालयाशी संपूर्ण चर्चा करून ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून ठरविण्यात येतो. ईपीएफओकडून यावर्षी जुलै महिन्यात व्याजदर निश्चित करण्यात आला होता. मागील वर्षी EPFOने आपल्या ग्राहकांसाठी व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 2020-21 मध्ये 8.10 टक्क्यांपर्यंत चार दशकांच्या नीचांकी पातळीपर्यंत कमी केला होता. जो 1977-78 नंतर हा सर्वात कमी होता, जेव्हा पेन्शन व्याजदर 8% होता. ईपीएफ खात्यावरील व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते परंतु, वार्षिक आधारावर सदस्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. तर जमा होणारी व्याजाची रक्कम चक्रवाढनुसार वाढते, जी पुढील महिन्याच्या शिल्लक रकमेत जोडली जाते. पेन्शन खातेधारक हे EPFO च्या पोर्टलला म्हणजेच https://www.epfindia.gov.in/site_en/For_Employees.php या साईटला भेट देऊन आपल्या खात्यावरील पेन्शनची रक्कम तपासू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -