घरअर्थजगतहवाई प्रवासात भारतीय पदार्थांचा आस्वाद घ्या, एअर इंडियाने नियम बदलले

हवाई प्रवासात भारतीय पदार्थांचा आस्वाद घ्या, एअर इंडियाने नियम बदलले

Subscribe

नवी दिल्ली – भारतात सध्या सण उत्सवांचा माहोल तयार झाला आहे. दिवाळीतही अनेकजण आपल्या आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी विविध ठिकाणी जात जात असतात. अशातच, टाटांच्या एअर इंडियाने देशांतर्गत हवाई उड्डाणासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. देशांतर्गत हवाई उड्डाणादरम्यान प्रवाशांना आता ग्लोबल पदार्थांसह अस्सल भारतीय पदार्थही मिळणार आहेत. १ ऑक्टोबरपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

भारतीय व्यंजनांचा लाभ घेण्याकरता प्रवाशांना तिकिट बुक करतानाच खाद्यपदार्थ निवडावं लागणार आहे. यामध्ये गोड पदार्थ, फळांचा ज्यूस, कोल्ड्रींकसुद्धा देण्यात येणार आहे. तसंच, बिझनेस क्लास प्रवाशांना बटरयुक्त पफ, साखरफ्री डार्क चॉकलेट, ओटमील मफिन आणि क्रीमी चिकन सॉसेससुद्धा देण्यात येणार आहेत. याशिवाय विविध भारतीय व्यंजनांचा सुद्धा बिझनेस क्लासमधील प्रवासांना लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसाठीही खास स्वादिष्ट खाद्यान्नांची सुविधा देण्यात येणार आहे. नाश्त्यामध्ये चीज, मशरूम, ऑमलेट, ड्राय जीरा भाजी, पालकची भाजी वगैरे मिळणार आहे. तसंच, व्हेज बिर्यानी आणि मिश्रीत भाज्याही खाता येणार आहेत. याशिवाय, प्रवाशांना हाय टीमध्ये भाज्या, फ्राईड नुडल्स, चिली चिकन आणि ब्लुबेरी वेनिला पेस्ट्रीसह अनेक गोड पदार्थही मिळणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -