फेडरल बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात केली वाढ, जाणून घ्या नवीन दर

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 8 जून 2022 रोजी रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ जाहीर केली. रेपो  दर 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला. यापूर्वी, 4 मे 2022 रोजी आरबीआयने रेपो दर 0.40 टक्क्याने वाढवून 4.00 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांनी वाढवला होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India – RBI) रेपो दरात (repo rate) वाढ केल्यानंतर बँकांनीही (Bank) कर्जाचे व्याजदर ( interest rates on loans) वाढवण्यास सुरुवात केली आहे. कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. खासगी क्षेत्रातील बँक फेडरल बँकेने आपल्या बचत खात्याच्या व्याजदरात (interest rates on savings accounts) वाढ केली आहे.

फेडरल बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 5 कोटींपेक्षा कमी रकमेवरील व्याजदर 2.75 टक्के झाला आहे. जर ही रक्कम 5 कोटींपेक्षा जास्त असेल तर 1 लाखांपर्यंतच्या जमा रकमेवर 2.75 टक्के व्याज दिले जाईल. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 8 जून 2022 रोजी रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ जाहीर केली. रेपो  दर 4.40 टक्क्यांवरून 4.90 टक्के केला. यापूर्वी, 4 मे 2022 रोजी आरबीआयने रेपो दर 0.40 टक्क्याने वाढवून 4.00 टक्क्यांवरून 4.40 टक्क्यांनी वाढवला होता.

नुकतेच कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. बँकेने ५० लाखांपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदर ३.५ टक्क्यांवरून ४ टक्के केला आहे. हा नवीन व्याजदर 13 जून 2022 पासून लागू होईल. कोटक महिंद्रा बँकेने 50 लाखांपेक्षा कमी ठेवी असलेल्या बचत खात्यांवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. तो सध्याच्या 3.5 टक्क्यांवर स्थिर आहे.