Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार आर्थिक व्यवहार, जाणून घ्या कसे ते...

बँक खात्यात पैसे नसतानाही करता येणार आर्थिक व्यवहार, जाणून घ्या कसे ते…

Subscribe

ऑनलाईन व्यवहार करताना तुमच्या बँक खात्यात पैसे असणे हे अत्यंत आवश्यक आहे. पण आता पैसे नसले तरी तुम्हाला पेमेंट करता येणार अशी सुविधा बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबई : हल्ली सर्वच लोक ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत. म्हणजेच, युनिफाइड पेमेंट इंटरफेस प्रणाली अर्थात UPI चा वापर वाढला आहे. परंतु ऑनलाईन व्यवहार करताना तुमच्या बँक खात्यात पैसे असणेही तितकेच आवश्यक आहे. पण आता पैसे नसले तरी तुम्हाला पेमेंट करता येणार अशी सुविधा बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी खरं तर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून यासाठी मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्रणालीमधील व्यवहारांसाठी बँकांद्वारे जारी केलेल्या प्री अप्रुव्ह्ड क्रेडिट लाइनला मंजुरी दिली देण्यात आली असली तरी आता रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर युपीआयमध्ये व्यवहारांसाठी बँकांद्वारे दिली जाणारी प्री अप्रुव्ह्ड लोन सेवा जोडली जाईल. ज्यानंतर बँकांना ग्राहकाच्या खात्यात पैसे नसतानाही पेमेंट करता येईल. (Financial transactions that can be done even when there is no money in the bank account)

हेही वाचा – ‘सनफिस्ट’च्या एका बिस्किटाची किंमत एक लाख रुपये! ग्राहकाच्या नशिबी मनस्ताप अन् पैसे देखील

क्रेडिट लाइन सुविधा म्हणजे काय?

- Advertisement -

ज्याप्रमाणे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खातेधारकांना हवे असेल तेव्हा कर्ज दिले जाते. त्याचप्रमाणे क्रेडिट लाइन सुविधा सुद्धा कर्जाचा एक प्रकार आहे. जेव्हा ग्राहकांना कर्ज हवे असेल तेव्हा ते प्री अप्रुव्ह्ड करण्यात येईल. म्हणजेच, बँकेकडून तुम्हाला निश्चित कर्जाची रक्कम अधीच मंजूर करण्यात येईल. तुम्ही हे पैसे युपीआय पेमेंटकरिता किंवा तुम्हाला आवश्यकता असेल तेव्हा वापरू शकता. या अंतर्गत, यातून तुम्ही खर्च केलेल्या रकमेवर बँक तुमच्याकडून व्याज आकारेल. युपीआय क्रेडिट लाइन अंतर्गत, बँक तुमची क्रेडिट डिस्ट्री आणि प्रोफाइल लक्षात घेऊन कर्जाची मर्यादा ठरवेल. या कारणास्तव ही मर्यादा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते.

ही सुविधा कशी मिळवाल?

ज्याप्रमाणे बँक खातेधारकांना क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा लागतो, त्याचप्रमाणे क्रेडिट लाइन सुविधा घेण्यासाठी देखील तुम्हाला बँकेकडे अर्ज करावा लागणार आहे. यानंतर बँकेकडून ही सुविधा तुमच्या खात्याशी लिंक करण्यात येईल. रिझर्व्ह बँकेकडून मंजुरी मिळाल्यानंतर, बहुतेक सरकारी आणि खाजगी बँका लवकरच ही सुविधा सुरू करू शकतात, अशी शक्यता आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -