घरअर्थजगत७५०० पेक्षा जास्त मेन्टेनन्स भरणार्‍यांना फ्लॅटमालकांना १८ टक्के जीएसटी

७५०० पेक्षा जास्त मेन्टेनन्स भरणार्‍यांना फ्लॅटमालकांना १८ टक्के जीएसटी

Subscribe

दरमहा ७,५०० रुपयांपेक्षा अधिकचा देखभाल खर्च (मेन्टेनन्स) देणार्‍या फ्लॅटमालकास १८ टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) द्यावा लागणार आहे. वित्त मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. प्रति फ्लॅट ७,५०० पेक्षा अधिकचा देखभाल खर्च असेल, तसेच संबंधित हाऊसिंग सोसायटीची वार्षिक उलाढाल २० लाखांपेक्षा अधिक असेल, तर दरमहा जीएसटी जमा करणे बंधनकारक आहे. देखभाल खर्च ७,५०० रुपयांपेक्षा कमी असेल, तरच जीएसटीमधून सूट मिळेल. हे मासिक योगदान ७,५०० रुपयांपेक्षा जास्त झाल्यास रक्कम करपात्र ठरेल. इमारतीतील प्रति सदस्य देखभाल खर्च ९ हजार असेल, तर संपूर्ण रकमेवर १८ टक्के जीएसटी लागेल. ९ हजारातून साडेसात हजार वजा करून उरलेल्या १,५०० रुपयांवर जीएसटी लावता येणार नाही.

…तर जीएसटी नाही
एखाद्या सोसायटीत वा निवासी संकुलात एकाचे दोन फ्लॅट असल्यास दोन्ही फ्लॅटवर स्वतंत्रपणे ७,५०० रुपयांची सवलत मर्यादा गृहीत धरली जाईल. म्हणजेच दोन्ही फ्लॅटचे मिळून १५ हजार रुपये (प्रत्येक फ्लॅटचे ७,५०० रुपये) मासिक देखभाल खर्च देणार्‍यास जीएसटी लागणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -