घरअर्थजगत'या' कारणामुळे गो फर्स्ट एअरलाइन्सला DGCA ने बजावली नोटीस

‘या’ कारणामुळे गो फर्स्ट एअरलाइन्सला DGCA ने बजावली नोटीस

Subscribe

मुंबई | देशात जेट ऐअरवेजनंतर आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. गो फर्स्ट एअरलाईन्स (Go First Airlines) ही विमान कंपनीने दिवाळीखोरी घोषित करण्यासाठी एनसीएलटीकडे (NCLT) मंगळवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. गो फर्स्ट एअरलाईन्सने ३ मे आणि ४ मे रोजीची सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. यामुळे गो फर्स्ट एअरलाईन्सला नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे नियामक (DGCA) यांनी कारण दाखवा नोटीस बजावली आहे. गो फर्स्टने प्रवाशांना कोणतीही माहिती न उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

गो फर्स्ट एअरलाईन्स कंपनी ही वाडिया ग्रुपची आहे. गो फर्स्ट एअरलाईन्सने एनसीएलटीकडे दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देखील दिली आहे. गो फर्स्टने ज्याप्रमाणे दोन दिवसांसाठी त्यांच्या विमान प्रवाशांची तिकिटे काढली आहेत. यामुळे कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisement -

सरकार गो फर्स्टला शक्यती मदत करणार – ज्योतिरादित्य सिंधिया

गेल्या अनेक दिवसांपासून गो फर्स्ट एअरलाईन्सला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.  या आर्थिक संकटात सापडलेल्या विमान कंपनीसाठी इंजिन बनवणाऱ्या प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन कंपनीने पुरवठा बंद केला आहे. यामुळेच एअरलाईन्स कंपनीच्या निधीत कमतरता भासू लागली आहे. तेल कंपन्यांची थकबाकी ही रोख रकमेअभावी भरण्यास सक्षम नसल्यामुळे गो फर्स्टला फ्युएल देण्यास नकार दिला आहे. यामुळे गो फर्स्टने ३ आणि ४ मे रोजी सर्व उड्डाणे रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. “सरकार अडचणीत असलेल्या गो फर्स्ट एअरलाईनला शक्य ती सर्व मदत करणार असून या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवले जात आहे”, असे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले.

- Advertisement -

प्रवाशांची मंत्रालय आणि डीजीसीएसकडे तक्रार

हेही वाचा – गो फर्स्ट एअरलाइन्स आर्थिक तोट्यात; वाडिया समूह बाहेर पडणार?

गो फर्स्टने उड्डाणे रद्द केल्यानंतर कारण दाखवा नोटीस

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या गो फर्सट एअरलाईन्सच्या ३ आणि ४ मे रोजी दोन दिवस उड्डाणे रद्द करण्याच्या निर्णयासंदर्भात नागरी विमान वाहतूक क्षेत्राचे नियामक यांनी कारण दाखवा नोटीस बजावली आहे. गो फर्स्टने प्रवाशांना कोणतीही माहिती न उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे डीजीसीएने म्हटले आहे. गो फर्स्टने दिलेल्या वेळापत्रकाचे पालन करणे गरजेचे होते. परंतु, गो फर्स्टने ते न केल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन कराना लागला. यामुळे गो फर्स्टला कारण दाखवा नोटीस बजावली आहे. या प्रकरणी गो फर्स्ट एअरलाईन्सने २४ तासांच्या आत उत्तर देणे अपेक्षित आहे. प्रवाशांनी तिकीट काढलेल्या प्रवाशांना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी काय पावले उचलली आहेत, याची माहिती देण्यासाठी सांगितले आहे. आणि कंपनीला ५ मेपासून फ्लाईच्या वेळापत्रकाराचा तपशील द्यावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -