‘गो फर्स्ट’च्या दिवाळखोरीमुळे विमान भाड्यात होऊ शकते वाढ

मुंबई | गो फर्स्ट एअरलाईन्सने (Go First Airlines) दिवाळखोरी घोषित करण्यासाठी एनसीएलटीकडे (NCLT) मंगळवारी अर्ज दाखल केला आहे. त्या पार्श्वभूमीवर गो फर्स्टने पुढील दिवस उड्डाण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि भारतीय विमान सेवेच्या दृष्टीने ही चिंतेची बाब असून या निर्णयामुळे देशातील इतर एअरलाईन्सवर मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाच्या (TAAI) अध्यक्षा ज्योती मयाल (Jyoti Mayal) यांनी व्यक्त केली आहे. “गो फर्स्टने उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय एअरलाईन्स उद्योगाच्या दृष्टीने चांगला नाही. यामुळे काही मार्गावरील विमान भाड्यात वाढ होऊ शकते”, असे ज्योती मयाल यांनी म्हटले.

प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिन पुरवठा संकटामुळे गो फर्स्टने ३ मेपासून पुढील तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणे रद्द केली आहे.  “सध्या एअरलाईन उद्योगासाठी अत्यंत वाईट परिस्थिती आहे. किंगफिशनर एअरलाईन्समध्ये आमचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच जेट एअरवेज वेळीही तोटा सहन करावा लागला होता. यानंतर आता आणखी एक विमान कंपनी दिवाळखोरीच्या दिशेन वाटचाल करत आहे”, असे ज्योती मयाल म्हणाल्या.

हेही वाचा – “आर्थिक जबाबदारी झटकण्याची गो फर्स्टची पहिलीच वेळ नाही”, अमेरिकन कंपनीचे गंभीर आरोप

ज्योती मयाल पुढे म्हणाल्या “गेल्या १७ वर्षाहून अधिक काळ गो फर्स्ट भारतीय विमान क्षेत्रात कार्यरत आहे. गो फर्स्ट ही अशावेळी दिवाळखोरीचे सावट आले की, जेव्हा देशांतर्गत हवाई वाहतूक वाढत आहे. सध्या सुट्टीचा हंगाम असल्यामुळे विमान प्रवासाची मागणी जास्त आहे. आणि यात गो फर्स्टच्या आर्थिक संकटामुळे येत्या आठवड्यात विमान भाडे वाढले.”

कंपनीने रद्द केलेल्या फ्लाइटचे पैसे प्रवाशांना परत करावे लागेल, या प्रश्नावर ज्योती मयाल म्हटल्या, “विमान कंपनी  दिवाळखोरी होते. तेव्हा नियम थोडे बदलतात.” तसेच यावेळी २६ मार्च ते २८ ऑक्टोबर या उन्हाळ्याच्या वेळापत्रकानुसार, गो फर्स्ट दर आठवड्याला १ हजार ५३८ उड्डाण चालविली आहेत.