घरअर्थजगतGold Price Today: सोन्यात मोठी घसरण, पटापट तपासा नवे दर

Gold Price Today: सोन्यात मोठी घसरण, पटापट तपासा नवे दर

Subscribe

फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.17 टक्क्यांनी घसरून आज 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या व्यवहारात चांदीही खूप स्वस्त झाली. आज 1 किलो चांदीचा भाव 0.19 टक्क्यांनी घसरून 61,298 रुपयांवर आलाय.

नवी दिल्लीः लग्नसराईच्या मोसमात सोन्याच्या भावात गेल्या तीन दिवसांपासून घसरण सुरूच आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज फेब्रुवारी डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.05 टक्के घसरलाय. चांदीची किंमतही 0.8 टक्के घसरणीसह व्यापार करत होती. ऑगस्ट 2020 मध्ये एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांची सर्वोच्च पातळी गाठली होती. आज MCX वर सोने फेब्रुवारी फ्युचर्स 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही 8000 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त मिळत आहे.

जाणून घ्या आज सोने-चांदीची किंमत काय?

फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याची किंमत 0.17 टक्क्यांनी घसरून आज 48,160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या व्यवहारात चांदीही खूप स्वस्त झाली. आज 1 किलो चांदीचा भाव 0.19 टक्क्यांनी घसरून 61,298 रुपयांवर आलाय.

- Advertisement -

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर शोधा

सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवा दर पाहू शकता.

अशा प्रकारे तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता

आता तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलेय. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या (गोल्ड) माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतही तत्काळ माहिती मिळणार आहे.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -