घरअर्थजगतGold Price Today : सोने पुन्हा एकदा महागले; पटापट तपासा तोळ्याचा भाव

Gold Price Today : सोने पुन्हा एकदा महागले; पटापट तपासा तोळ्याचा भाव

Subscribe

मल्टीकमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 24कॅरेटचा शुद्धतेचा भाव 50,990 रूपये प्रति 10 गॅमवर पोहचला होता. जी आता 50,947 रूपये प्रति 10 ग्रॅमच्या व्यहारात करण्यात आले आहे

नवी दिल्लीः आंतराष्ट्रीय बाजारामध्ये बुधवारी सोने-चांदीच्या (Gold-Silver Price) दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव हा पुन्हा वाढताना पाहायला मिळतोय. बाजारातील चढउतारांमुळे सोन्याचा भाव एका महिन्याच्या आधारावर कमी पातळीवर पोहोचला होता, परंतु आता पुन्हा तो वाढताना दिसतोय.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) 24 कॅरेटच्या शुद्धतेचा भाव 50,990 रुपये प्रति 10 गॅमवर पोहोचला होता. जो आता 50,947 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होता. सतत होणाऱ्या घसरणीमुळे सोन्याचे भाव महिन्याभरात कमी झाले होते. आज सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 0.25 टक्क्यांनी वाढला आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येण्याच्या शक्यतेमुळे सोन्याच्या भावात 1.2 टक्क्यांनी घसरला असून, 50,354 रुपयांवर आला आहे. ही आता एका महिन्यातील ही सर्वात कमी किंमत आहे.

- Advertisement -

चांदीचा भावही भडकला

एमसीएक्सवर (MCX) आज बुधवारी चांदीच्या (silver Price) भावामध्ये 0.23 टक्क्यांनी अधिक उसळी आल्याने चांदीचा दर पुन्हा 67 हजारावर गेला आहे. सकाळी चांदीचा भाव प्रतिकिलो 67,102 रुपये होता. यामुळे सतत होणाऱ्या घसरणीमुळे चांदीचा दर 67 हाजारांवर पोहोचला आहे.

- Advertisement -

जागतिक बाजारात (global market) गेल्या काही दिवसांत सोन्याचा दर 2 टक्क्यांनी घसरला होता. आता 0.1 टक्क्यांनी वाढला देखील आहे. मंगळवारी तो 1.8 टक्क्यांनी घसरून 28 फेब्रुवारीनंतरच्या कमी पातळीवर आला होता. सोन्याची किंमत आज 1,920.6 डॉलर प्रतिवर पोहोचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -