घरअर्थजगतसोन्याच्या किमतीत घसरण सुरूच, 6 महिन्यांत 6000 रुपयांनी स्वस्त, आजचा भाव काय?

सोन्याच्या किमतीत घसरण सुरूच, 6 महिन्यांत 6000 रुपयांनी स्वस्त, आजचा भाव काय?

Subscribe

आज सकाळी फ्युचर ट्रेड सोने एमसीएक्सवर 0.3 टक्के घसरून 49,237 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करीत आहे. ही सोन्याच्या किमतीतील सहा महिन्यांमधील सर्वात नीचांकी घसरण आहे. चांदीसुद्धा एमसीएक्सवर सकाळी जवळपास 56,820 रुपये प्रति किलोग्रामवर व्यापार करीत होती

नवी दिल्लीः अमेरिकेत गेल्या आठवड्यात महागाईचे आकडे जाहीर झाल्यानंतर जगभरातील बाजारात गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. खरं तर गेल्या आठवड्यात घोषित झालेले आकडे अपेक्षेपेक्षा खराब होते. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात व्याजदरात मोठी वाढ करू शकते. त्यामुळे गुंतवणूकदार अमेरिकन डॉलरमध्ये गुंतवणूक करण्याला पसंती देण्याची शक्यता आहे. तसेच डॉलर बाँडचं मूल्य वाढल्याने गुंतवणूकदार अमेरिकेच्या डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे त्यांचा सोन्याकडचा कल काहीसा कमी झाला आहे. तसेच घरगुती बाजारातील सोन्याची मागणीसुद्धा कमी झालीय. या कारणांमुळे गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 1500 रुपये म्हणजेच 3 टक्के घसरण झालीय.

या कारणास्तव घसरतोय भाव

गेल्या आठवड्यात अमेरिकेत महागाईशिवाय अन्य महत्त्वाचे आकडेही जारी झालेत. कामगार बाजारातील ताकद, किरकोळ विक्रीचे आकड्यांनुसार तज्ज्ञांना वाटते की, फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात एका झटक्यात व्याजदर 01 टक्के म्हणजे 100 बेसिस पॉइंटने वाढवण्याची घोषणा करू शकते. तसेच डॉलर ताकदवान झाल्याने सोने कमकुवत होत आहे. सोन्याच्या भावातील घसरण या आठवड्यातही कायम आहे. आज सकाळी फ्युचर ट्रेड सोने एमसीएक्सवर 0.3 टक्क्यांनी घसरून 49,237 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करीत आहे. ही सोन्याच्या किमतीतील सहा महिन्यांमधील सर्वात नीचांकी घसरण आहे. चांदीसुद्धा एमसीएक्सवर सकाळी जवळपास 56,820 रुपये प्रति किलोग्रामवर व्यापार करीत होती.

- Advertisement -

जागतिक बाजारात, स्पॉट मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव 0.42 टक्क्यांनी घसरून 1,667.85 प्रति औंस डॉलर झाला. अमेरिकेतील सोन्याच्या फ्युचर्सचा भावही आज घसरला. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही झपाट्याने घसरण होत आहे. जागतिक बाजारात चांदीचा भाव 0.22 टक्क्यांनी घसरून 19.36 डॉलर प्रति औंस झाला. प्लॅटिनमही 0.47 टक्क्यांनी स्वस्त होऊन 902.73 डॉलर प्रति औंस झाला. त्याचप्रमाणे पॅलेडियमची किंमत 0.89 टक्क्यांनी घसरून 2,115.22 डॉलर प्रति औंस झाली.

फेडरल सोन्याचे भवितव्य ठरवेल

गेल्या काही काळापासून अमेरिकन डॉलरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. डॉलरचा दर आता जवळपास 20 वर्षांतील सर्वात मजबूत आहे. जगातील प्रमुख 06 चलनांच्या बास्केटमध्ये आज सकाळी डॉलरचा निर्देशांक 0.2 टक्क्यांनी वाढून 109.84 वर पोहोचला. त्याच वेळी यूएसमध्ये ट्रेझरी उत्पन्न 10 वर्षांमध्ये सर्वात जास्त आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांसमोर चांगला परतावा उपलब्ध होतो. सोन्यासह बहुतांश महागड्या धातूंच्या किमती घसरण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.

- Advertisement -

फेडरल रिझव्‍‌र्हची व्याज दरवाढ याला आणखी हातभार लावत आहे. या आठवड्याच्या धोरण बैठकीत फेडरल रिझर्व्ह एका झटक्यात 01 टक्क्यांनी व्याजदर वाढवण्याची घोषणा करू शकते. विश्लेषक असे गृहीत धरत आहेत की, 0.75 टक्‍क्‍यांच्या दरवाढीत काही शंका नाही, उलट फेडरल रिझर्व्ह एकाच वेळी 1 टक्‍क्‍यांनी दर वाढवू शकते. फेडरल रिझर्व्हच्या या घोषणेनंतर सोने-चांदीच्या भावी वाटचालीचा अंदाज बांधता येईल.

6 महिन्यांत 6000 रुपयांनी स्वस्त

देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाले तर गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. ऑक्टोबर MCX गोल्ड फ्युचर्स 0.38 टक्क्यांनी घसरून 49,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करीत आहे. डिसेंबरमध्ये असलेल्या चांदीचे भाव 0.13 टक्क्यांनी किरकोळ वाढून 56,796 रुपये प्रति किलोवर व्यवहार करीत होते. देशांतर्गत बाजारात या वर्षी मार्चच्या मध्यात सोन्याचा भाव 55,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​गेला होता.

सरकारने आयात शुल्क वाढवले ​

सरकारने अलीकडेच सोन्याच्या आयातीवरील मूळ आयात शुल्क 12.5 टक्के केले. यापूर्वी त्याचा दर 7.5 टक्के होते. भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. भारताला आपल्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी सोने आयात करावे लागते. कच्च्या तेलानंतर सोने हा भारताच्या आयात बिलातील सर्वात मोठा घटक आहे. सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारने शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जागतिक बाजारात किमती कमी झाल्याने भारतातही सोने स्वस्त होत आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.


हेही वाचाः प्रत्यक्ष कर संकलनात ३० टक्क्यांनी वाढ, चालू आर्थिक वर्षात एक हजार कोटींचा एकूण परतावा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -