घरअर्थजगतमहागाईचा आणखी एक झटका; आंघोळीचा साबण, शाम्पू, पावडर महागले

महागाईचा आणखी एक झटका; आंघोळीचा साबण, शाम्पू, पावडर महागले

Subscribe

दरवाढीमुळे कंपनीला वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून  हिंदुस्तान युनिलिव्हर सतत उत्पादनांच्या किमती वाढवत आहे. जानेवारीपासून कंपनीने उत्पादनाच्या किमतीत चौथ्यांदा वाढ केली आहे. 

वाढत्या महागाईमध्ये सर्वसामान्यांना आता आणखी एक झटका बसला आहे. देशातील सर्वात मोठी एफएमजीसी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडची साबण, शाम्पू, पावडर आदी उत्पादने महागली आहेत. हिंदुस्तान युनिलिव्हरने आपल्या उत्पादनांच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. याशिवाय कंपनीने कॉफी, केचप, टूथपेस्टच्या किमतीत 4 ते 13 टक्क्यांनी वाढ केली आहे. या आठवड्यात कंपनीचे सीईओ संजीव मेहता यांनी पाम तेल आणि कच्च्या तेलाच्या वाढीमुळे  उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले होते.

हिंदुस्तान युनिलिव्हरने 125 ग्रॅम पिअर्स साबणाची किंमत 2.4 टक्क्यांनी वाढवली आहे, तर मल्टीकॅपची किंमत 3.7 टक्क्यांनी वाढली आहे. लक्स साबणाच्या मल्टीपॅकच्या किमतीत 9 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कंपनीने शाम्पूच्या किमती 15 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. कंपनीने सनसिल्क शाम्पूच्या किमतीतही 8 ते 10 रुपयांनी वाढ केली आहे. त्याचवेळी, क्लिनिक पल्स शॅम्पूच्या 100 मिली पॅकच्या किंमतीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. साबण आणि शाम्पू व्यतिरिक्त स्किन क्रीम ग्लो अँड लव्हलीच्या किमतीत 6 ते 8 टक्के वाढ झाली आहे. तर पॉन्डच्या टॅल्कम पावडरच्या किमतीतही ५ ते ७ टक्क्यांनी वाढ केली आहे. जानेवारीपासून चौथ्यांदा कंपनीची उत्पादने महागली आहेत.

- Advertisement -

हॉर्लिक्स आणि कॉफीही महागली
पर्सनल केअर उत्पादने आणि शाम्पू, साबण याशिवाय कंपनीने खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढवल्या आहेत. हॉर्लिक्स, ब्रू कॉफी आणि किसान केचपचे भाव  4 ते 13 टक्क्यांनी वाढवले आहेत. दरवाढीमुळे कंपनीला वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून  हिंदुस्तान युनिलिव्हर सतत उत्पादनांच्या किमती वाढवत आहे. जानेवारीपासून कंपनीने उत्पादनाच्या किमतीत चौथ्यांदा वाढ केली आहे.

मार्चमध्ये दरवाढ

- Advertisement -

हिंदुस्तान युनिलिव्हर आणि नेस्ले यांनी 14 मार्चपासून मॅगी, चहा, कॉफी आणि दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. यावेळी हिंदुस्तान युनिलिव्हरने ब्रू कॉफीच्या किमती ३ ते ७ टक्के, ब्रू गोल्ड कॉफी जार 3 ते 4 टक्के इन्स्टंट कॉफी पाऊच 3 ते 6.66 टक्क्याने वाढवल्या. याशिवाय, ताजमहाल चहाच्या किमती 3.7 ते 5.8 टक्के आणि ब्रुक बाँड प्रकारातील वैयक्तिक चहाच्या किमती 1.5 टक्के  ते 14 टक्के ने वाढल्या आहेत.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -