फ्लॅट, दुकान खरेदी महागणार! ‘या’ कारणामुळे किंमतींमध्ये १५ टक्क्यांची होणार वाढ

home construction rates real estate price could go up by 15 percent in fy23 says credai
फ्लॅट, दुकान खरेदी होणार महाग! 'या' कारणामुळे किंमतींमध्ये १५ टक्क्यांची होणार वाढ

बांधकाम क्षेत्रातील मंदीचे वातावरण आणि कोरोना संकटामुळे प्रॉपर्टीसच्या किंमतींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. यामुळे प्रॉपर्टी खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता वाढत्या किंमतींचा सामान करावा लागणार आहे. यंदा दुकानं आणि फ्लॅटच्या किंमतींमध्ये जवळपास १० ते १५ टक्क्यांची वाढ होणार आहे. रिअल इस्टेट कंपन्यांची सर्वोच्च संस्था क्रेडाईने सिमेंट आणि स्टीलच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली आहे.

Credai ने सांगितले की, बांधकामांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये घट झाली नाही तर, भविष्यात प्रॉपर्टीजच्या किंमतींमध्ये १० ते १५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. यामुळे कच्च्या मालाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलावीत अशी मागणी उद्योग संस्थांनी केली आहे. शिवाय बांधकाम क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (GST) कमी करावा अशी सूचना दिली आहे.

कनफेडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले की, बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किंमतींमध्ये जानेवारी २०२० पासून सतत वाढ होतेय. यावर उद्योग संस्थांनी सांगितले की, कोरोनाचे कडक नियम आणि कामगारांच्या घटत्या संख्येमुळे बांधकाम क्षेत्रातील प्रॉपर्टीसच्या किंमती गेल्या १८ महिन्यात जवळपास १० ते १५ टक्क्यांना वाढल्यात.

क्रेडाईचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोदिया यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून आम्ही बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतींमध्ये सतत होणारी वाढ पाहतोय. आणि भविष्यातही या किंमती कमी होतील अशी शक्यता नाही. मात्र या वाढत्या किंमतींचा बोझा बिल्डर स्वत:वर न घेता घरं किंवा प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या ग्राहकावर टाकतील.


Powai Fire : पवईतील साई ह्युंडाई कंपनीच्या सर्विस सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल