घरअर्थजगतIncome Tax Slab Budget 2023-24: अर्थमंत्र्यांकडून कर रचनेत मोठा बदल, आता तुमच्या...

Income Tax Slab Budget 2023-24: अर्थमंत्र्यांकडून कर रचनेत मोठा बदल, आता तुमच्या पगारावर किती कर आकारणार?

Subscribe

प्राप्तिकरात आता 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीतील लोकांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही

नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडत असताना मोठ्या घोषणा केल्यात. 2.5 लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या 6 टप्प्यातील उत्पन्न कर रचनेत बदल करण्यात आला आहे. या व्यवस्थेतील कर रचनेत बदल करत करमुक्त सवलतीची मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबबाबत मोठी घोषणा केली आहे. आता नव्या करप्रणालीनुसार 7 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला कोणताही कर भरावा लागणार नाही. आतापर्यंत ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत होती. अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकर रचनेत वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्राप्तिकरात आता 5 लाख रुपयांवरून 7 लाख रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. नवीन कर प्रणालीतील लोकांना सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही.

जुन्या रचनेत 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. यानंतर 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जात होता, मात्र सरकारकडून (रिबेटच्या स्वरूपात) 12,500 रुपयांची सूट मिळत असल्यानं हेही नगण्य झाले होते. याचा अर्थ जुन्या कर रचनेतही तुम्हाला पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर कर भरावा लागत नव्हता. एका आर्थिक वर्षात तुम्हाला किती आयकर भरावा लागेल, याची गणना करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्राप्तिकर स्लॅब अंतर्गत येत आहात हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्या आर्थिक वर्षासाठी तुम्ही कोणती प्राप्तिकर रचना निवडता यावरही प्राप्तिकराचे मोजमाज अवलंबून असते. यासाठी तुम्हाला जुन्या आणि नवीन दोन्ही प्राप्तिकरांची तुलना करावी लागेल. प्राप्तिकर स्लॅब आणि तुमच्या उत्पन्नावर किती कर आकारला जाईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचे करपात्र उत्पन्न काय आहे, म्हणजेच तुम्हाला तुमच्या उत्पन्नावर किती कर भरावा लागेल हे शोधावे लागेल.

- Advertisement -

तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडल्यास तुम्ही कर सूट किंवा कर कपातीचा दावा करण्यास मोकळे असाल. या अंतर्गत तुम्हाला घरभाडे भत्ता सूट, रजा प्रवास भत्ता सूट, मानक वजावट यासारख्या गोष्टींवर कर सूट मिळते. तसेच या नियमात तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C ते 80U अंतर्गत कर सूट मिळू शकते. तुमच्या एकूण उत्पन्नातून कर सूट आणि कर कपात केल्यानंतर जी रक्कम उरते ती तुमची करपात्र उत्पन्न असेल, म्हणजेच तुम्हाला त्यावर प्राप्तिकर भरावा लागेल.

नवीन कर रचना अशी असणार

- Advertisement -

0 ते 3 लाख रुपये – 0
3 ते 6 लाख रुपये – 5%
6 ते 9 लाख रुपये – 10%
9 ते 12 लाख रुपये – 15%
12 ते 15 लाख रुपये – 20%
15 लाखांहून अधिक रुपये – 30%


हेही वाचाः Union Budget 2023 : सरकारकडून महिलांसाठी मोठं गिफ्ट, महिला सन्मान बचत पत्राची घोषणा

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -