घरअर्थजगतदिलासादायक! भारतातील 'या' तीन बँका बुडणार नाहीत; वाचा नेमके कारण काय?

दिलासादायक! भारतातील ‘या’ तीन बँका बुडणार नाहीत; वाचा नेमके कारण काय?

Subscribe

एखादी बँक बुडीत निघाल्यास संबंधित बँकेतील खातेधारकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांनी आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी SBI, ICICI, HDFC या बँकामध्ये खाते उघडले आहेत. मात्र, या बँकाही बुडणार का? असा सवाल बँकेतील खातेदारकांना सतावतो आहे.

एखादी बँक बुडीत निघाल्यास संबंधित बँकेतील खातेधारकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेकांनी आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी SBI, ICICI, HDFC या बँकामध्ये खाते उघडले आहेत. मात्र, या बँकाही बुडणार का? असा सवाल बँकेतील खातेदारकांना सतावतो आहे. मात्र, या खातेदारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण या तीन बँका बुडणार नसल्याची माहिती समोर येत आहे. (India Sbi Icici And Hdfc Banks Will Never Fail)

अमेरिकेतल्या बँका बुडीत निघत असून, त्याचा बँकिंग क्षेत्राना मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील बँकिंग क्षेत्रात आतापासून सतर्कतेची पावले उचलण्यास सुरूवात झाली आहे. भारतात SBI, ICICI आणि HDFC अशा तीन बँका असून, या बँका भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या बँका बुडणे केंद्र सरकारला परवडणारे नाही.

- Advertisement -

अमेरिकन बँका बुडाल्याचा भारताच्या बँकिंग व्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नसला तरी एकामागून एक बँका बुडण्याच्या या घटनांमुळे लोकांची चिंता वाढली आहे.

कॅपिटल बफर म्हणजे बँकेच्या कामासाठी लागणाऱ्या रोख रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त रोकड ठेवणे. जेणेकरून जेव्हा रोख रकमेची मागणी जास्त असेल, तेव्हा ती पूर्ण करता येईल. परंतु भारतात अशा तीन बँका आहेत, ज्या इतक्या मोठ्या आहेत की, त्या बुडू शकत नाहीत. अशा बँकांना D-SIB म्हणतात. RBI ने ICICI बँक, SBI आणि HDFC बँकेचा D-SIB मध्ये समावेश केला आहे.

- Advertisement -

RBI या बँकांना D-SIB यादीत ठेवते आणि त्यांच्यासाठी कठोर नियम बनवलेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका बुडाल्या आहेत. RBI देशातील सर्व बँकांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर, त्यांच्या ग्राहकांच्या आधारावर पद्धतशीर महत्त्व स्कोअर देते. बँक रन म्हणजे जेव्हा बँकेचे अनेक ग्राहक एकाच वेळी त्यांचे पैसे काढू लागतात आणि बँकेतील रोख ठेव कमी होते किंवा संपते, त्याला बँक रन म्हणतात.


हेही वाचा – बिहार हिंसाचार : सुरक्षेच्या कारणात्सव केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा सासाराममधील कार्यक्रम रद्द

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -