घरअर्थजगतITR Update: मोदी सरकारचं गिफ्ट, आता 75 वर्षांवरील नागरिकांना ITR भरण्याची गरज...

ITR Update: मोदी सरकारचं गिफ्ट, आता 75 वर्षांवरील नागरिकांना ITR भरण्याची गरज नाही

Subscribe

विशेष म्हणजे यासाठी आयकर कायदा 1961 मध्ये कलम 194P हे नवीन कलम जोडण्यात आले आहे. याबाबत काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, त्याबाबत बँकांना माहिती देण्यात आली आहे

नवी दिल्लीः मोदी सरकारने आयटीआरबाबत मोठा बदल केलाय. आतापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही पैशाच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत होता. मात्र सरकारने आता 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना यातून सूट दिली आहे. खरं तर ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ पेन्शन आणि व्याजातून उत्पन्न मिळते, त्यांना आता आयकर विवरणपत्र भरण्याची आवश्यकता नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात ट्वीट करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे यासाठी आयकर कायदा 1961 मध्ये कलम 194P हे नवीन कलम जोडण्यात आले आहे. याबाबत काही नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, त्याबाबत बँकांना माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जारी केलेल्या माहितीनुसार, हे कलम कार्यान्वित करण्यात आले आहे. यासाठी संबंधित फॉर्म आणि अटींबाबत अधिसूचना प्रसिद्ध केलीय. तसेच नियम 31, नियम 31A, फॉर्म 16 आणि 24Q मध्ये आवश्यक सुधारणाही करण्यात आल्यात.

- Advertisement -

विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणातही याची घोषणा केली होती, “आता आम्ही आमच्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्षात आहोत, त्यामुळे आम्ही आमचा प्रवास उत्साहाने पुढे चालू ठेवू. देशातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांवरील कराचे ओझे कमी होणार आहे. अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांचे उत्पन्न पेन्शन आणि व्याजातून येते, आम्ही त्यांना आयकर भरण्यातून सूट दिलीय,” असंही त्या म्हणाल्या होत्या.

- Advertisement -


खरं तर हा नियम आधीच लागू करण्यात आला होता. परंतु आता त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आणि बँक खात्यावर व्याज मिळते, परंतु त्यांना रिटर्न फाइलही करावी लागते. आता त्यांना आयटीआर भरावा लागणार नाही. यासाठी कलम 194P आता कार्यान्वित करण्यात आले आहे. बँकांना त्यांच्या घोषणापत्र आणि इतर संबंधित फॉर्ममधील बदलांबद्दलही माहिती देण्यात आली आहे. परंतु मोदी सरकारने 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ही सूट दिली असली तरी सामान्य करदात्यांच्या नियमांमध्ये आणि त्यांच्या ITR फॉर्ममध्ये कोणताही बदल होणार नाही.


हेही वाचाः दिल्लीला पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; अफगाणिस्तानमधील हिंदू कुश केंद्रबिंदू

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -