घरअर्थजगतजेट एअरवेज पुन्हा उड्डाण करणार, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळाली सुरक्षा मंजुरी

जेट एअरवेज पुन्हा उड्डाण करणार, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळाली सुरक्षा मंजुरी

Subscribe

जेट एअरवेजवर 11 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे कंपनीवर आर्थिक संकट आले होते. कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाली.

बंद पडलेली विमान कंपनी जेट एअरवेज आता पुन्हा एकदा उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने रविवारी जेट एअरवेजला सुरक्षा मंजुरी दिली आहे. त्यामुळे जेट एअरवेज पुढील महिन्यापासून व्यावसायिक उड्डाणे चालवू शकते. जेटने 5 मे रोजी एअर ऑपरेटर प्रमाणपत्रासाठी हैदराबादहून चाचणी उड्डाण घेतले होते. यावेळी कंपनीने ट्विट करून याबाबत माहिती दिली होती.

दिवाळखोरीत गेल्यामुळे जेट एअरवेजने 7 एप्रिल 2019 रोजी आपले कामकाज बंद केले होते. यानंतर, तीन वर्षांनंतर, कंपनीने प्रथमच चाचणीसाठी उड्डाण केले. जेट एअरवेजचे सीईओ संजीव कपूर यांनी सांगितले होते की, एअर ऑपरेटर परमिटच्या प्रक्रियेला मंजुरी दिल्यानंतर काही महिन्यांनी जेट पुन्हा आपले कामकाज सुरू करेल.

- Advertisement -

जेट एअरवेजवर 11 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे कंपनीवर आर्थिक संकट आले होते. कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर जेट एअरवेजची उड्डाणे बंद झाली. जेट एअरवेजने एप्रिल 2019 मध्ये शेवटचे उड्डाण केले. यानंतर कंपनीची विमानसेवा ठप्प झाली. मात्र, मुरारी लाल जालान आणि कालराॅक कंसोर्टियमने जून 2021 मध्ये जेट एअरवेजची बोली जिंकली. आता सप्टेंबरपर्यंत पुन्हा एकदा जेट एअरवेजची विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कंपनीकडून संकेतही देण्यात आले आहेत.

नागरी उड्डान मंत्रालयाने ६ मे रोजी विमान कंपनीला पाठवलेल्या पत्रात केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या सुरक्षा मंजुरीबाबत माहिती देण्यात आली होती. एअरलाइनने गेल्या गुरुवारी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी हैदराबाद विमानतळावरून चाचणी उड्डाण केले होते. विमान आणि त्याचे घटक सामान्यपणे कार्यरत आहेत हे विमान वाहतूक नियामक डीजीसीएला सिद्ध करण्यासाठी चाचणी उड्डाण घेण्यात आले. आता जेटला आणखी एक विमान चालवावे लागेल.  त्यानंतर डीजीसीए एअर ऑपरेटर प्रमाणपत्र देईल.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -