घरअर्थजगतनिफ्टमध्ये नोकरीची संधी

निफ्टमध्ये नोकरीची संधी

Subscribe

निफ्ट म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT). इथे तुम्हाला नोकरी हवी असेल तर मोठी संधी आहे. निफ्टनं 179 पदांसाठी अर्ज मागवलेत. योग्य उमेदवारांनी 6 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज करावेत.
संस्थेचं नाव – राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्था
पदांची संख्या – 179
पद – सहाय्यक प्रोफेसर
अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 6 सप्टेंबर 2019.
शैक्षणिक योग्यता – पोस्ट ग्रॅज्युएट / डॉक्टोरल पदवी
वयाची मर्यादा – या पदांसाठी उमेदवाराचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त असू नये. अधिक माहितीसाठी nift.ac.in इथे क्लिक करा.
निवड प्रक्रिया – निवड लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूमधून केली जाईल.
असा करा अर्ज – योग्य उमेदवार NIFTच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. 18 जुलै 2019 (सकाळी 9 वाजता) ते 6 सप्टेंबर 2019 (संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत) ऑनलाइन अर्ज करू शकतात. पोस्टिंग दिल्लीत आहे.
हल्ली फॅशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढतेय. त्यात करिअर करणार्‍यांची संख्या वाढतेय. तुम्हाला कपड्यांची खूप आवड असेल तर तुम्ही फॅशन डिझायनर बनू शकता. पण तुम्हाला फॅशन डिझाइन आणि गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काही रस नसेल तर तुम्ही फॅशन स्टाइलिश बनू शकता. तुम्ही कधीही कोणाला तयार करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -