घरअर्थजगतरिलायन्स, बीपीसीएलशी जॉइन्ट व्हेंचरची घोषणा

रिलायन्स, बीपीसीएलशी जॉइन्ट व्हेंचरची घोषणा

Subscribe

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL)नं ब्रिटनची पेट्रोलियम कंपनी BPCLसोबत नव्या जॉइन्ट व्हेंचरची घोषणा केलीय. RIL, BPसोबतच्या भागीदारीनंतर देशात 5,500 पेट्रोल पंप उघडणार आहे. कंपनीच्या प्लॅनमध्ये रिटेल सर्विस स्टेशन नेटवर्कसोबत विमानाच्या इंधनाचा उद्योगही केला जाणार आहे. याआधी दोन्ही कंपन्या 2011पासून एकत्र व्यवसाय करत आहेत.

कंपनीनं सांगितलंय की, भारतात पुढच्या 20 वर्षात जगातला सर्वात मोठा इंधनाचा बाजार असेल. RIL आणि बीपी मिळून देशात 1400हून जास्त साइट्सवर RILच्या आताच्या इंधन रिटेलिंग नेटवर्कचा समावेश करेल. 5 वर्षात 5,500 साइट्सपर्यंत विकास करण्याचं लक्ष्य आहे.

- Advertisement -

यात रिलायन्सच्या हवाई इंधनाच्या उद्योगाचाही समावेश आहे. कंपनी देशातल्या 30 विमानतळांवर इंधन पुरवते. या करारानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि बीपीचे ग्रुप प्रमुख एक्झिक्युटिव्ह बॉब डुडले यांनी सही केलीय. मुकेश अंबानी म्हणाले की या भागीदारीमुळे आम्ही खूश आहोत. ही भागीदारी बीपी आणि रिलायन्सच्या मजबूत संबंधांचा मापदंड आहे. ते पुढे म्हणाले की यामुळे देशात आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सेवा वाढतीलच आणि ग्राहकांबरोबरचे आमचे संबंध आणखी घट्ट होतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -