घरअर्थजगतKisan Credit Card: कसा कराल ऑनलाईन अर्ज, फायदा काय आणि किती मिळणार...

Kisan Credit Card: कसा कराल ऑनलाईन अर्ज, फायदा काय आणि किती मिळणार कर्ज? जाणून घ्या

Subscribe

देशातील शेतकऱ्यांना अल्प मुदतीसाठी कर्ज देण्याच्या उद्देशाने Kisan Credit Card (KCC) योजना सुरु करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेतीविषयक आवश्यक गरजा कमी व्याजदरात कर्ज घेऊन पूर्ण करु शकतो. या योजनेतून शेतकऱ्यांचे हित वाढविण्यासाठी सरकारने अर्ज प्रक्रिया देखील सोपी केली आहे.

Kisan Credit Card चे फायदे

१) कर्जाची परतफेड करण्याची सुलभ प्रक्रिया आणि सर्व शेती आणि त्यासंबंधित कामांसाठी सिंगल क्रेडिट सुविधा

- Advertisement -

२) बियाणे, खते इत्यांदींच्या खरेदीत सहकार्यासह व्यापारी किंवा विक्रेत्यांकडून रोख सूट मिळण्यास मदत

३) हंगामी पीक संपल्यानंतर कर्जाची परतफेड करण्याची सुविधा

- Advertisement -

४) आवश्यक कर्ज मिळवण्यासाठी कमी कागदपत्रे

५) भारतातील कोणत्याही बँकेतील शाखेतून पैसै काढण्याची मुभा

Kisan Credit Card साठी कोण पात्र आहे?

जर आपण शेतकरी असाल किंवा त्यासंबंधित गटाशी जोडले असाल तर संयुक्त कर्जदार असाल तर तुम्हाला लोन मिळू शकते. तसेच भाडेकरु शेतकरी, किंवा शेतीत भागीदार, तोंडी पट्टेदार यांनी कर्ज मिळू शकते. तर बचतगट किंवा शेअर्स क्रॉपर्स शेतकरी, भाडेकरु इत्यादींचा संयुक्त गटही किसान क्रेडिट कार्डसाठी पात्र आहे.

Kisan Credit Card साठी कोणती कागदपत्रे गरजेची?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक सूचनांनुसार, किसान क्रेडिट कार्ड अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे जारी करणार्‍या बँकेच्या अंतर्गत मार्गदर्शक सूचनांनुसार असाव्यात कारण प्रत्येक बँकेकडे आवश्यक कागदपत्रांचा वेगळा सेट असतो.

१) पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी पुराव्यांची गरज आहे.

२) राहत असलेल्या ठिकाणाचा अधिकृत पुरावा

३) जमीनीचे कागदपत्रे

४) अर्जदाराचे पासपोर्ट साईडचे फोटो

किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

१) बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

२) क्रेडिट कार्डच्या दिसणाऱ्या यादीमधून ‘किसान क्रेडिट कार्ड’चा पर्याय निवडा.

३) ‘अॅप्लिकेशन’ बटणावर क्लिक करा.

४) आपल्याला ऑनलाइन अर्ज पेजवर जाण्यास सांगितले जाईल.

५) सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.

आपण अर्ज सबमिट करतो त्यानंतर कॅम्प्युटर सिस्टम ऑटोमेटिक आपल्याला अर्ज क्रमांक जनरेट करेल. या अर्ज क्रमांकाची आपल्याकडे नोंद करुन ठेवा कारण भविष्यात पून्हा कर्जाची गरज लागल्यास याचा वापर करु शकता. आपण पात्र अर्जदार असल्यास, बँक तुमच्या अर्जावर प्रक्रिया करेल आणि आपल्याला ३ ते ४ दिवसांच्या आत कॉल करेल आणि अर्जाची पुढील प्रक्रियेसंदर्भात माहिती देईल.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -