Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत मॅनहोलमध्ये उतरून नालेसफाई करणाऱ्या कामगारांसाठी यंदाच्या बजेटमध्ये सरकारची मोठी घोषणा!

मॅनहोलमध्ये उतरून नालेसफाई करणाऱ्या कामगारांसाठी यंदाच्या बजेटमध्ये सरकारची मोठी घोषणा!

Subscribe

नालेसफाईची कामे करणाऱ्या कामगारांच्या आवश्यक सुरक्षेसाठी उपाय म्हणून आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या बजेटमध्ये मोठी घोषणा केलीय.

Budget 2023 Manhole to Machine-hole mode : सफाई कामगारांना मॅनहोलमध्ये उतरून सफाईचे काम करावे लागते. सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टॅन्कची सफाई करण्यासाठी उतरलेल्या कामगारांच्या मृत्यूच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही सफाईची कामे करणाऱ्या कामगारांच्या आवश्यक सुरक्षेसाठी उपाय म्हणून आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजच्या बजेटमध्ये मोठी घोषणा केलीय. नालेसाफसफाई करण्यासाठी सफाई कामगारांना आता थेट नाल्यात उतरण्याची गरज राहणार नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी सांगितले की, राज्य आणि शहरांना शहरी नियोजनाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले जाईल. सर्व शहरातील गटारे आणि सेप्टिक टाक्या ‘मॅनहोल टू मशीन होल मोड’ मध्ये रूपांतरित करण्यास प्रयत्न केले जाणार आहेत. सीतारामन यांनी हाताने सफाईची प्रथा बंद करण्याच्या उद्देशाने ही घोषणा केली.

- Advertisement -

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संसदेत बोलत असताना हा विषय प्रकाशझोतात आणला होता. २०१७ पासून गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना तब्बल ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची बाब त्यांनी त्यावेळी उघडकीस आणली होती.

- Advertisement -

बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, शहरांना देखील नगरपालिका बाँडसाठी प्रोत्साहन दिले जाईल. सरकारने २५ जून २०१५ रोजी स्मार्ट सिटी मिशन सुरू केले. जानेवारी २०१६ ते जून २०१८ या कालावधीत स्पर्धेच्या चार फेऱ्यांद्वारे १०० स्मार्ट शहरांची निवड करण्यात आली.

गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प २०२३ पेपरलेस स्वरूपात सादर केला. अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेच्या दिशेने जात असताना निर्मला सीतारामन या पारंपारिक लाल रंगाचं वहीखातं घेऊन जाताना दिसल्या. त्यावर राष्ट्रीय प्रतिकही लावण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी सोनं-चांदीचं नक्षीकाम केलेली रेड टेंपल साडी परिधान केली होती. डिजीटल टॅबद्वारे संकल्प सादर केलाय.

- Advertisment -