Eco friendly bappa Competition
घर अर्थजगत मॅनकाईंड फार्मा कंपनीचा IPO आजपासून रिटेल सेक्शनसाठी खुला

मॅनकाईंड फार्मा कंपनीचा IPO आजपासून रिटेल सेक्शनसाठी खुला

Subscribe

मुंबई | मॅनकाईंड फार्मा कंपनीच्या (Mankind Pharma Company) आयपीओला अँकर गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा आयोपीओ (IPO) आज खुला झाला आहे. मॅनकाईंड फार्मा कंपनीने ७७ फंड्सला १०८० रुपये प्रति शेअर्सप्रमाणे १.२ कोटी शेअर्स अलॉर्ट केले आहे. अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी १२९८ कोटी रुपये जमवले आहेत.

दरम्यान, रिटेल गुंतवणूकदारांसाठी हा आयोपीओ आज खुला झाला आहे. गुंतवणूकदार आयपीओमध्ये २७ एप्रिलपपर्यंत सबस्क्राईब्ड करू शकतात. कंपनीच्या शेअर्सचा प्राईस बँड १.२६ रुपये ते १०८० रुपये प्रती शेअर्स आहे. या आयपीओची साईज ४३२६ कोटी रुपये आहे. संपूर्णपणे आयपीओ ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

कंपनीचे शेअर्स आज ९० रुपये प्रिमियमवर उपलब्ध आहेत. तर सोमवारच्या तुलनेत किंमत १५ रुपयांनी अधिक असून मॅनकाईंडचा जीएमपी सोमवारी ७५ रुपये होता. या आयपीओची शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग ८ मेला होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मॅनकाईंड फार्मा कंपनीच्या आयपीओवर ‘या’ कंपनीने दाखविला विश्वास

- Advertisement -

कंपनीने ७७ गुंतवणूकदारांमध्ये बोर्ड, गव्हर्मेंट आँफ सिंगापूरस माॅनेटरी अथाॅरिटी आँफ सिंगापूर, कॅनडा पेंन्शन प्लान इन्व्हेस्टमेंट्स, अबुधाबी, नोमूरा आणि माॅर्गन स्टेनले यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त एसबीआय म्युच्युअल फंड्स, अॅक्सिस म्युच्युअल फंड्स, निप्पोन इंडिया म्युच्युअल फंड्स, आदित्य बिर्ला सन लाईफ आणि एचडीएफसी म्युच्युअल फंड्स या कंपन्यांनी मॅनकाईंड फार्मा कंपनीच्या आयपीओवर विश्वास दाखविला आहे.

 

 

 

- Advertisment -